एक हजार रुपयाची लाच घेताना अंबादास कदम यांना अटक

107
Adv

 शासकीय अनुदानाचा धनादेश बँकेत पाठवण्याकरता 1 हजाराची लाच स्विकारणार्‍या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील टंकलेखक लिपिकास रंगेहात अटक करण्यात आली. अंबादास गोविंद कदम (वय–३१,सध्या रा. सह्याद्री टॉवर जवळ राजवाडा, सातारा) असे त्याचे नाव आहे.

कदम यांनी संबंधित तक्रारदाराकडे मंजूर शासकीय अनुदानाचा धनादेश बँकेत पाठवण्याकरता 1 हजार रूपयाची मागणी केली होती. यासंबंधी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला असता कदम यांना 1 हजाराची लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले

पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती सुषमा चव्हाण, पोलीस उपअधीक्षक लाप्रवि सातारा, अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, पो.ना ताटे, पो.कॉ.काटकर, खरात, पो.कॉ सपकाळ, लाप्रवि, सातारा विभाग यांनी ही कारवाई केली.

Adv