वाठार स्टेशन पिंपोडे बु ॥ रोड वर वाकडया पुला जवळ 407 टेम्पो व दुचाकीच्या अपघातात युवक जागीच ठार.
: बांधकाम खात्याच्या हलगर्जी पणा मुळे खड्डा चुकवताना आज
शुक्रवार दिनांक 17 जानेवारी 2020 रोजी सकाळी 9:20 वा.च्या सुमारास वाठार स्टेशन पिंपोडे रोडवर वाकडया पुला जवळ मोटर सायकल व 407 टेम्पो चा अपघात झाला अपघातात युवक जागीच ठार.
वाठार स्टे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाठार स्टेशन बाजूकडून जाणारी मोटारसायकल क्रमांक MH 11CC 6504 व पिंपोडे बुद्रुक बाजूकडून येणारा 407 टेम्पो क्रमांक MH11 T 5500 वाकडया पुला जवळ आल्यानंतर मोटरसायकल व 407 टेम्पो यांच्यामध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली.धडक एवढी जोराची होती की मोटर सायकल चालक रोडच्या ऊजव्या बाजूस फेकला गेला.
जोरदार धडके मुळे मोटरसायकल चालक अक्षय गोविंद अनपट वय.24 रा.अनपटवाडी सध्या रा घिघेवाडी ता. कोरेगांव हा युवक जागीच ठार झाला.घटनेची खबर मिळताच वाठार पोलिस स्टेशनचे कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी हजर झाले.मृतास शवविच्छेदन करण्यासाठी पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. पुढील तपास वाठार पोलिस स्टेशनचे स पो नि घोंगडे यांच्या मार्ग दर्शना खाली, पोलिस कर्मचारी चोरट व त्यांचे सहकार्या पुढील तपास करीत आहेत.