गेली 80 वर्ष दुर्लक्षित असलेली सातारा शहरातील राजवाडा परिसरातील मध्यवर्ती ठिकाणची जागा गेले तीन वर्ष नगरसेविका म्हणून निवडून आल्यापासून सातत्याने प्रयत्नशील राहून या जागेमध्ये बगीच्या विकासासाठी प्रयत्न करून अटल स्मृती उद्यान या नावाने मंत्रालयात प्रस्ताव दाखल केला असून लवकर त्याला मान्यता मिळणार असल्याची माहिती नगरसेविका सिद्धी पवार यांनी दिली
सदरच्या जागेचे पाहणी आज उपनगराध्यक्ष किशोर शिंदे नगरसेविका सिद्धी पवार व अधिकाऱ्यांच्या मार्फत केली असून सदर जागी सातारा शहरातील वेगळ्या पद्धतीची बगीच्याचे संकल्पना राबवण्याचा मानस जोपासताना आज पर्यंत सतत पाठपुरावा करून सदर जागेसाठी प्राथमिक स्वरूपाचा निधी मंजूर झाल्यानंतर त्यावरील प्रस्तावित अटल स्मृती उद्यान याकरिता जागेची पाहणी तसेच सदर जागेत जमीन सपाटीकरण व मोजणी आज करण्यात आली
या ठिकाणचा बगीच्या हा सर्व सातरकरणसाठी विशेषतः पश्चिम भागातील वयोवृद्ध ,महिला व सर्व नागरिकांना विसाव्याचे ठिकाण ठरणार आहे मध्यवर्ती ठिकाणी असलेला हा बगीच्या गर्दीच्या ठिकाणीसुद्धा शांततेचा परिसर म्हणून ओळखला जाईल हे निश्चित आणि यासाठी म्हणून अद्ययावत यंत्रणा वापरली जाणार आहे याठिकाणी असलेली मोठी झाडे त्याच्याभोवती बसण्याकरता अत्याधुनिक पद्धतीचे व्यवस्था केली जाणार आहे आणि असे बरेच अंतर्गत कामकाज केले जाणार आहे सदर दुर्लक्षित जागा शासनाच्या नजरेत आणून सदर जागी अत्याधुनिक बगीच्या प्रस्तावित केलेला आहे आणि याठिकाणच्या विकासाची सुरुवात मोजणी व सपाटीकरनापासून झाली आहे व लवकरच भारताचे माजी पंतप्रधान श्रद्धेय अटलजींच्या नावाने व समरणार्थ अत्याधुनिक उद्यान नावारूपाला येईल आणि हीच खरी सातारकर जनतेच्या कडून त्यांना श्रद्धांजली ठरेल . अशी भावनाही नगरसेविका सिद्धी पवार यांनी यावेळी व्यक्त केली