सरदार वल्लमभाई पटेल यांच्या जयंती निमीत्त 31 ऑक्टोंबर रोजी सातारा पोलीस विभागामार्फत एकता दौडचे ( Run for Unity ) आयोजन करण्यात आले आहे. ही एकता दौड पोवईनाका शिवाजी सर्कल – पोलीस मुख्यालय सातारा – शेटेचौक – शनिवारचौक – जुना मोटार स्टँड चौक -सम्राट चौक – मोती चौक अशी असणार आहे. एकता दौडच्या अनुषंगाने सातारा शहरात दि.31 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 ते 10 या वेळेत खालीलप्रमाणे वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहे, अशी माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही.ए. शेलार यांनी दिली आहे.
अ) दैनंदिन वाहतूकीचे बंदी घालण्यात येणारे मार्ग :- पोवईनाका शिवाजी सर्कल – पोलीस मुख्यालय – शेटेचौक – शनिवारचौक – जुना मोटार स्टॅड चौक – सम्राटचौक- मोतीचौक हा रस्ता येणारे-जाणारे सर्व प्रकारचे वाहनां करीता वाहतूकीसाठी बंद राहील.
वाहतूक मार्गातील बदल/पर्यायी मार्ग :- मोतीचौक येथून पोवईनाका शिवाजी सर्कल बाजूकडे येणारी सर्व वाहने सोयीनुसार राजपथावरुन – शाहुचौक- ट्राफिक ऑफिस – सावंत कॉर्नर रविवार पेठ – लोणार गल्ली – मरिआई कॉम्पलेक्स अथवा काटदरे मसाले दुकान कॉर्नर – एम.एस.ई.बी. ऑफिस – राधिका टॉकीज चौक – राधिका रोडने – एस.टी.स्टॅड – पोवईनाका अशी सातारा शहरात ये-जा करतील.
एकता दौड करिता येणारे नागरीक आपली वाहने पोवईनाका ते पोलीस परेड ग्राऊड जाणारे मार्गावर वन साईड पार्किंग तसेच जिल्हाधिकारी सातारा यांचे कार्यालयाचे बाहेरील रोडवर वन साईड पार्किंग करतील तरी वरील वाहतूकीतील बदलाची नागरिकांनी व वाहन चालकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.