कांगा कॉलनी येथील निकृष्ट रस्त्या संदर्भात अरबाज शेख करणार 2 मार्च रोजी आत्मदहन

49
Adv

कांगा कॉलनी येथील निकृष्ट रस्त्याच्या संदर्भात अरबाज शेख दिनांक 2 मार्च ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे याबाबत बांधकाम सभापती मिलिंद काकडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही हे दुर्दैवच म्हणावे की दर्शन लक्ष्मीचे

दलित वस्ती योजनेअंतर्गत सुमारे 75 लक्ष रुपये खर्च करून निकृष्ट रस्ता करण्याचा सातारा पालिकेने विश्वविक्रम केलाय नगरसेविका स्नेहा नलवडे वगळता एकही पदाधिकारी या रस्त्याच्या संदर्भात बोलायला तयार नाही हे दुर्दैव अभियंता भाऊ साहेब पाटील व संबंधित सभापती मिलिंद काकडे यांच्या संगनमतानेच हे निकृष्ट काम झाले असल्याचा आरोप शेख यांनी केला आहे ,
मोठ्या दिमाखाने पालिकेचे इंजिनियर साबळे साहेब सांगतात की आम्ही याची गुणवत्ता तपासणी केली आहे कोणासमोर केली हे त्यांनाच माहिती बऱ्याच नागरिकांनी समाजसेवकांनी यात लक्ष्मी दर्शन घेतले म्हणूनच त्याची गुणवत्ता उत्कृष्ट झाली असे दिसते

समाजसेवक अरबाज शेख यांनी याबाबतची तक्रार मुख्यमंत्री कार्यालय ,बांधकाम मंत्री कार्यालय, जिल्हाधिकारी सातारा इतर मान्यवरांकडे केली आहे संबंधित ठेकेदारावर दोन तारखेपर्यंत ठोस निर्णय झाला नाही तर 2 मार्च रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा अरबाज शेख यांनी यावेळी दिला आहे

Adv