सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा मग 7 दिवसांचा पगार का??-ना. बच्चू कडू

52
Adv

उद्धव ठाकरे सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 29 फेब्रुवारीपासून 5 दिवसांचा आठवडा असणार आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीतला हा मोठा निर्णय मानला जातोय. परंतू हाच निर्णय सरकारमधील मंत्री बच्चू कडू यांना आवडलेला नाहीये. त्यांनी या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा मग 7 दिवसांचा पगार का??, असा सवाल केला आहे.

कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा मग 7 दिवसांचा पगार कशासाठी? सरकारी कर्मचारी 2 दिवसांचं तरी काम करतात का हे अगोदर शासनाने तपासावं, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. 5 दिवसांचा आठवडा केल्याने सरकारी कर्मचारी आनंदित आहेत मात्र दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामावर सर्वसामान्यांना काही आक्षेप आहे आणि हेच आक्षेप कडू यांनी अधोरेकित केले आहेत.

आठवडा चार दिवसांचा केला तरी चालेल पण ते दोन दिवसांचं काम करतात का हे पाहा, अशा शब्दात कडू यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
जो चांगला कर्मचारी आहे त्याचा पगार वाढवा…. त्याला 4 दिवसांचा आठवडा करा पण अधिकारी आणि कर्मचारी जर काम करत नसेल तर त्याला पगार कशासाठी द्यायचा? त्याच्या कामाचं मुल्यमापन झालं पाहिजे, असं कडू म्हणाले आहेत

Adv