सद्यस्थितीत #अवकाळी_पाऊस आणि वादळामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे. याच अनुषंगाने शिवसेना नेते, #युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व नवं निर्वाचित शिवसेना आमदार यांना सोबत घेऊन महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल सन्माननीय श्री भगत सिहं कोश्यारी यांची #राजभवन येथे जाऊन भेट घेत महाराष्ट्रात #ओला_दुष्काळ जाहीर करणे बाबत शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.