माननीय धनंजय मुंडे यांच्या विधानसभा यशानंतर रिक्त झालेली विधानपरिषदेची जागा भरण्याची चर्चा सुरू झाली असता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा *सौ.रूपालीताई चाकणकर* यांचे नाव राज्यभर घुमू लागले.
राष्ट्रवादीच्या जिंकलेल्या 55 आमदारांमध्ये फक्त तीन महिला आमदार आहेत त्यामुळे महिला सशक्तिकरणचा वारसा असलेल्या राष्ट्रवादीने यंदा विधानपरिषदेत महिलांना बळ देण्याचे निश्चित केले आहे.राष्ट्रवादीतून तडकाफडकी भाजपात गेलेल्या चित्रा वाघ यांच्यानंतर पुणे शहराध्यक्षा *सौ.चाकणकर* यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळली, विधानसभेच्या प्रचारादरम्यान त्यांनी स्टार प्रचारक म्हणून अक्खा महाराष्ट्र पिंजून काढला त्यांच्या मेहनतीला मिळालेला प्रतिसाद म्हणूनच काय यंदा महिलांनीही राष्ट्रवादीला भरघोस मते दिली.
*
कुशल नेतृत्व*, *सभ्य वक्तृत्व*, *सुशिक्षित व स्वच्छ राजकारणी* म्हणून त्यांनी स्वतःची छाप निर्माण केली, ह्यामुळेच त्या राज्यभर लोकप्रिय झाल्या.शहराध्यक्षपदी असताना त्यांनी महिलांचे संघटन मजबूत केले, वेळोवेळी महिलांचे प्रश्न मांडत असताना आंदोलने केली, चळवळी केल्या ह्या दरम्यान विविध गुन्हे त्यांच्यावर नोंदवण्यात आले, आरोप-प्रत्यारोप झाले पण त्या परखडपणे त्याला सामोरे गेल्या.खासदार सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या सौ.चाकणकर यांच्या कामाची दखल पक्षश्रेष्ठी पासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत घेतली गेली त्यामुळे त्यांचा विधानपरिषदेचा मार्ग सोपा होताना दिसत आहे.सौ.चाकणकर जर विधान परिषदेवर गेल्या तर नक्कीच महिलांचे प्रश्न त्या आक्रमकपणे मांडतील आणि महिलांच्या हक्कांसाठी लढतील.