छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा प्रचंड चढला आहे. राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत
छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा प्रचंड चढला आहे. राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवरायांची तुलना मोदींशी करणं महाराजांच्या वंशजांना मान्य आहे का? असा सवाल केला. त्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला तसेच उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घालण्याची मागणी केली. संभाजीराजे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली.
संभाजीराजे म्हणाले, “उद्धवजी संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घाला. ते प्रत्येक वेळी छत्रपती घराण्यावर गरळ ओकून राजकारण करत आहेत. त्यांनी आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंतीमध्ये काय बोललो आहे ते. त्यांची मुजोरी सहन केली जाणार नाही.”