इंदुरीकर महाराजांचा निर्धार, किर्तनाचा वसा सोडणार नाही…

57
Adv

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीने महाराजांच्या विरोधात रान पेटविले आहे. यावर आता इदुरीकर महाराज यांनी मी किर्तनाचा वसा सोडणार नाही अस ठासून सांगितल आहे.

मी तब्बल 17 ग्रंथांच्या आधारे ‘ते’ विधान केले आहे. मी अजूनही माझ्या विधानावर ठाम आहे. उठवलेल्या टिकेच्या झोडीमुळे काही काळ अस्वस्थ झालो. कीर्तन सोडून शेती करावी असा विचार आला होता. उद्विग्नता आली. समाजप्रबोधनाचा वसा कोणत्याही स्थितीत सोडणार नाही, असा निर्धार कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी उंडेगाव (ता. गंगाखेड) येथे शनिवारी रात्री किर्तनादरम्यान व्यक्त केला आहे.

तर दुसऱ्या बाजूला तृप्ती देसाई यांनी पुन्हा एकदा महाराजांवर हल्लाबोल केला असून, आपला देश धर्मानुसार आणि पुराणानुसार चालत नाही. तो संविधानानुसार चालतो. इंदोरीकर महाराजांनी कीर्तन करायचे की, शेती करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न. असल्याचे ही म्हंटल आहे.

Adv