धीरज देशमुख यांना रॅपिड फायर प्रश्नोत्तरात आगामी काळात मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल, रोहित पवार की आदित्य ठाकरे असा प्रश्न विचारल्यानंतर महाराष्ट्राने ठरवायचं आहे असे उत्तर दिले.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी साताऱ्याचे भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागितल्याने गेल्या काही दिवसांपासून वाद निर्माण झाला होता. संजय राऊत यांच्या या विधानाचा निषेध म्हणून गुरुवारी सातारा बंद ठेवण्यात आला होता.
तसेच आज शिवप्रतिष्ठानने देखील सांगली बंदची हाक दिली होती. त्यामुळे संजय राऊत आणि उदयनराजे या दोघांपैकी नेमका धीर कोणी धरावा असा प्रश्न देखील अवधूत गुप्ते यांनी धीरज देशमुख यांना मुलाखतीत विचारला. यावर धीरज देशमुख यांनी उदयनराजे हे राजे असून ते श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे बाकीच्यांनी धीर धरावा असं म्हणत धीरज देशमुखांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.