दादा.. परत फिरा…गोविंदबागेकडे, ‘या’ बहिणीने Facebookवर दिली हाक!

79
Adv

अजित पवार यांचे मन वळवण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांसह पवार कुटुंबीयांकडून प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यांच्याकडे स्वगृही परतण्याचा आग्रह केला. परंतु अजित पवार यांचे मन वळवण्यात हे दोन्ही नेते अपयशी ठरले. दोन्ही नेते रिकाम्या हाताने परतले असताना राष्ट्रवादीच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ‘दादा.. परत फिरा…गोविंदबागेकडे’ या शीर्षकाखाली फेसबुक पोस्ट करून भावनिक आवाहन केले आहे. आता एकाकी पडलेले अजित पवार स्वगृही परत फिरणार का, याकडेच सर्व पक्ष कार्यकर्त्यांचे डोळे लागले आहे.

आमचा काय गुन्हा??? काय चूक आमची.?? आमच्या सगळ्या बहिणीचे आणि विशेष म्हणजे सुप्रियाताईचा दादा म्हणजे महाराष्ट्रातील हा दरारा असलेला आमचा “अजितदादा”. ताठ मानेने आम्ही महाराष्ट्रात फिरत असताना, कधी कशाचीच भीती वाटली नाही, कोणी त्रास देईल याची शंका मनात आली नाही.. कारण आमचा “दादा” आमच्यासोबत आहे.

Adv