Saturday, April 25, 2026
spot_img
Home Maharashtra मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

159
Adv

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला पुन्हा एकदा अपघात झाला असून, या अपघातातून ते बचावले आहेत. त्यांचे हेलिकॉप्टर पेण बोरगाव या ठिकाणी उतरविण्यात येत असताना हेलिकॉप्टरची चाके चिखलात रूतल्याने वैमानिकाचे हेलिकॉप्टरवरचे नियंत्रण सुटले.याच वेळी वैमानिकाने प्रसंगावधान दाखवल्याने हेलिकॉप्टरवर नियंत्रण पुन्हा मिळवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.यापूर्वीही मुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टरला तीनदा अपघात झाला होता.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील सभा संपवल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगड जिल्ह्यातील पेण येथे प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी रवाना झाले.या ठिकाणी पाऊस पडल्याने माती भिजून चिखल झाला होता. त्यामुळे पेण-बोरगाव येथील हेलिपॅडवर चिखल झाला होता.दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी पेण-बोरगाव येथे सात टन वजनाचे हेलिकॉप्टर उतरविण्यात आले असता हेलिपॅडवर चिखल असल्याने हॅलिकॉप्टरची चाके मातीत रुतली.पावसाळी वातावरण आणि चिखलामुळे वैमानिकाचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटण्याच्या स्थितीत असतानाच वैमानिकाने त्यावर नियंत्रण मिळवले. या नंतर मुख्यमंत्र्यांना सुखरुपपणे खाली उतरवण्यात आले. हेलिगो प्रा. लि. च्या या हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासग त्यांचे स्वीय सचिव, इंजिनिअर, पायलट आणि एक को पायलट असे पाचजण होते.यापूर्वीही मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत.

Adv