सातारा जिल्ह्यामध्ये भाजप हा नंबर एकचा पक्ष बनलेला आहे. जिल्हाध्यक्ष पदाची उंची यापूर्वीच्या जिल्हाध्यक्षांनी अत्यंत तळमळीने काम करून वाढवलेली आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर प्रदेश कार्यकारिणीने जी जबाबदारी टाकलेली आहे त्या विश्वासास मी निश्चित पात्र ठरून पक्षाचा विश्वास सार्थ ठरवणार आहे. जिल्ह्याच्या राजकीय वाटचालीमध्ये सर्व सदस्यांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी केले
सातारा जिल्ह्यामध्ये प्रथमच जिल्हाध्यक्ष म्हणून जाहीर झाल्यानंतर कदम यांचे प्रथमच आगमन झाल्यानंतर शिरवळ खंडाळा सातारा येथे ठीक ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत झाले . येथील हॉटेल लेक व्ह्यू च्या दालनात धैर्यशील कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी आमदार जयकुमार गोरे,माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सुनील काटकर प्रदेश कार्यकारणी उपाध्यक्ष विक्रम पावसकर, पंकज चव्हाण जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, शहराध्यक्ष विकास गोसावी, प्रदेश कार्यकारणी सदस्य गीतांजली कदम, रंजना रावत, दत्ताजी थोरात यावेळी उपस्थित होते
धैर्यशील कदम पुढे म्हणाले माझ्या कुटुंबाला कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही गेल्या 30 वर्षापासून मीराजकारणामध्ये सक्रिय आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भाजपच्या वरिष्ठांनी मोठा विश्वास टाकला आहे तो विश्वास सार्थ करण्यासाठी अत्यंत तळमळीने काम करून भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व समावेशकतेने मी काम करेल सध्याचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे रायगड येथे झालेल्या दुर्घटनेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे स्वतः घटनास्थळापर्यंत चालत गेले . या दुर्घटनेचे व्यवस्थापन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी नियंत्रण कक्षातून केले हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे सातारा जिल्ह्यामध्ये निर्णय प्रक्रियेत जिल्ह्यातील सर्व भाजपच्या सर्व सदस्यांना सामावून घेत काम करणार असल्याचे धैर्यशील कदम यांनी सांगितले
आमदार जयकुमार गोरे बोलताना म्हणाले गेल्या वर्षभराच्या वाटचालीमध्ये मला भारतीय जनता पार्टीने जिल्हाध्यक्षपदावर काम करण्याची जी संधी दिली आणि जिल्ह्यातील ज्या सदस्यांनी मला वेळोवेळी सहकार्य केले अशा सर्व सदस्यांचे मी आभार मानतो . सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी जी जबाबदारी दिली त्या जबाबदारी आम्ही कार्यकर्ता म्हणून पार पाडणार आहे जिथे जिथे माझी गरज पक्षाला पडेल त्या त्यावेळी मी उपलब्ध असणार असल्याचे त्यांनी जाहीर केले