बँकांच्या आता सर्वत्र समान वेळा दि. 1 नोव्हेंबरपासून निर्णयाची अंमलबजावणी.

92
Adv

राज्यस्तरीय बैंकर्स समितीने आयबीएचा आदेश आणि जिल्हा बँक व्यवस्थापकांनी तसेच जिल्हासतरीय समन्वयन समितीच्या सुचनेनुसार भारतीय बँक्स संघटना यांनी ग्राहकांसाठी सार्वजनिक बँकांच्या कामकाजाच्या आता  एकसमान वेळा केलेल्या आहेत.
            रहिवासी भागातील शाखांसाठी सकाळी नऊ ते दुपारी चार, व्यावसायिक, व्यापारी भागातील शाखांसाठी सकाळी अकरा ते सायंकाळी सहा व  कार्यालये व इतर भागातील शाखांसाठी सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशा  एकसमान वेळा केलेल्या आहेत.
            जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बैंकर्स मिटींग मध्ये झालेली चर्चा व लिड बँकेकड जिल्ह्यातील सर्व बँकांच्या जिल्हा समन्वयकांकडून प्राप्त झालेला त्या त्या बँकेचा अधिकृत तपशील, बँक ऑफ महाराष्ट्रच्या https://www.bankofmaharashtra.in/miscellaneous या वेबसाइटवर इच्छुकांच्या अवलोकनार्थ उपलब्ध आहे.

Adv