सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात आमदार मनोज घोरपडे यांनी चांगले रान तापवले होते मात्र अंतर्गत पक्षातील कुर गुडीमुळे आता हे तापलेले रान विझण्याच्या अवस्थेत असल्याची चर्चा तेथील मतदारांमध्ये रंगते
सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडसाद येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत उमटणार हे आता जवळजवळ स्पष्ट झाले असले तरी भाजपच्याच काही अंतर्गत कुरगुडीमुळे आत्तापर्यंत कराड उत्तर मध्ये पराजयाला समोर जावे लागले मात्र मनोज दादांच्या संयमामुळे चित्र उलटे झाले होते
सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी कडून सत्ता जाणार हे जवळजवळ निश्चित झाले होते मात्र अंतर्गत टेबलाखालून झालेल्या चर्चेने सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील लाट शमल्याचे दिसून येत आहे
दैनिक सातारा नामांने नेहमीच आवाज उठवला होता की एका काँग्रेस विचारी जिल्हाध्यक्षांमुळेच पक्षात अंतर्गत कलह वाढत चालला आहे हे सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत स्पष्ट झाले असून येथून पुढेही काँग्रेस विचारी जिल्हाध्यक्षाचा डुबलीकेट चेहरा देवाभाऊ जनतेसमोर आणणार का याकडे लक्ष लागले आहे