Tuesday, June 30, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District संग्रहालय अभिरक्षक प्रविण शिंदे यांची बदली

संग्रहालय अभिरक्षक प्रविण शिंदे यांची बदली

126
Adv

सातारा : श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, सातारा येथील अभिरक्षक प्रविण शिंदे यांच्या बदलीनंतर रिक्त होणाऱ्या पदावर मध्यवर्ती संग्रहालय, नागपूर येथील सहाय्यक अभिरक्षक विनायक नारायण निटदुकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शासनाच्या बदली आदेशानुसार, श्री. निटदुकर यांची सातारा येथील संग्रहालयात बदली करण्यात आली असून, आदेशात ही नियुक्ती प्रविण शिंदे यांच्या बदलीमुळे रिक्त होणाऱ्या पदावर प्रशासकीय कारणास्तव करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

कोरोना काळापासून संग्रहालयातील कामकाजाबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. यासंदर्भात आंदोलनेही झाली होती. या सर्व घडामोडींनंतर प्रवीण शिंदे यांची अखेर बदली झाल्याची माहिती समोर आली आहे.

आता नवीन अभिरक्षक पदभार स्वीकारल्यानंतर सातारा येथील संग्रहालयाच्या कामकाजात कोणते बदल होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Adv