Monday, April 6, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City गृहलक्ष्मी ते उद्योग लक्ष्मी महोत्सव विलासपूर मध्ये भरणार

गृहलक्ष्मी ते उद्योग लक्ष्मी महोत्सव विलासपूर मध्ये भरणार

307
Adv

युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष आणि उद्योजक संग्राम बर्गे यांच्या पुढाकाराने व श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रपरिवार यांच्या वतीने विलासपूर गोळीबार मैदान येथे सातारा शहरातील महिला भगिनींसाठी गृहलक्ष्मी ते उद्योगलक्ष्मी महोत्सव 2023 या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा महोत्सव दिनांक 4 व 5 फेब्रुवारी रोजी येथील गजानन गार्डन समोरील मैदान विलासपूर येथे भरवण्यात येणार आहे

आपल्या प्रभागातील महिला भगिनी तसेच बचत गटांनी बनवलेल्या वस्तू ग्रामीण खाद्यपदार्थ विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू सौंदर्यप्रसाधने फूड स्टॉल्स इत्यादी स्टॉल्सची रेलचेल या महोत्सवामध्ये असणार आहे या महोत्सवाच्या संदर्भात बोलताना युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे म्हणाले आपले उत्पादन आपली बाजारपेठ या संकल्पनेवर हा महोत्सव आधारित आहे सातारा जिल्ह्यामध्ये महिलांच्या विशेषतः महिला बचत गटांच्या तसेच होतकरू आणि घरगुती महिलांच्या हातामध्ये प्रचंड कलागुण आहेत त्यांनी बनवलेल्या वस्तूंना एक चांगली बाजारपेठ मिळावी आणि त्या बाजारपेठेच्या माध्यमातून त्यांना चांगले अर्थाजन व्हावे यासाठी हा व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे या माध्यमातून महिला या स्वयंपूर्ण होणार आहेत त्याकरिता या महोत्सवाचे आयोजन उपयुक्त ठरणार आहे .

या महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या महिलांनी स्टॉल नोंदणीसाठी गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 पर्यंत बुकिंग करावे असे आवाहन संग्रामभर्गे मित्र समूह परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे

Adv