तथाकथित पत्रकारावर कारवाई करा; पत्रकार संघटनांची मागणी

245
Adv

सातारा, दि. ६ : सध्या शहरात तोतया पत्रकारांचा वावर वाढला असून त्यापैकी एकजण हा आपण एका वृत्तपत्राचे प्रतिनिधी असल्याचे सांगून विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना पैशाची मागणी करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने शहरातील पत्रकार संघटनांनी या पत्रकारावर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन सातारा शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, किरण अडागळे नामक एक व्यक्ती आपण दोन वर्तमानपत्रांचा पत्रकार असल्याचे सांगून अनेक शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना पैशाची मागणी करत आहे. सदर व्यक्ती हा साताऱ्यातील कुठल्याही पत्रकार संघटनेचा सदस्य नाही.

सातारा शहरातील पत्रकार अत्यंत संवेदनशील असून अन्यायाविरोधात आवाज उठवून सामान्य माणसांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात. मात्र किरण अडागळेसारख्या अपप्रवृत्तीमुळे पत्रकारांची नाहक बदनामी होत आहे. सदर व्यक्तीची तातडीने चौकशी करुन त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

दरम्यान,सदर किरण अडागळे नामक व्यक्तीने कोणाला पैशाची मागणी केली असल्यास सातारा शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी केले आहे.

Adv