उपोषण करताच पाच तक्रारींचा झाला निपटारा

130
Adv

ग्रामपंचायत यशवंतनगर आणि शेंदुरजणे ता.वाई तर ग्रामपंचायत समर्थनगर,काशीळ त.सातारा यांच्या हद्दीतील अनाधिकृत बांधकामे असल्याची पुराव्यानिशी तक्रार दाखल केली होती.मात्र त्याबाबत सरपंच, ग्रामसेवक,गटविकास अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही.मात्र २ ऑक्टोबर पासून विविध तक्रारी करुन ही कारवाई होत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत उपोषणाला बसलो असता पहिल्याच दिवशी वाई तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायतीनी ६३,४९३ चौ.फु. एवढे अनाधिकृत बांधकामे असून त्यांच्यावर ग्रामपंचायतअधिनियमातील कलम १२४ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र दिले. तक्रार करून दखल घेतली नाही मात्र उपोषणाला बसलो की संबंधित ग्रामपंचायतींनी कारवाई केली.यामुळे संबंधित ग्रामपंचायतींना हजारो रुपयांचा ग्रामनिधी मिळाल्याचे समाधान असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सांगितले.

वाई तालुक्यातील यशवंतनगर ग्रामपंचायत हद्दीतील आर्या मंगल कार्यालयाचे १,३१९ चौ.फु.तर मधुरा गार्डनचे १९८९९ चौ.फु. क्षेत्रफळ अधिक केलेले विना परवाना बांधकाम असल्याचे वाई गटविकास अधिकारी यांनी लेखी दिले. ग्रामपंचायत समर्थनगर (ता.सातारा) येथील नवनाथ बर्वे, रेणुका बर्वे यांनी विनापरवाना केलेल्या अनाधिकृत बांधकामा बाबत नोटीस देऊन खुलासा मागविण्यात आला आहे. तसेच काशीळ येथील शनेरुबी मंजिल या बांधकामाबाबत सिकंदर शेख यांना नोटीस देऊन अनधिकृत बांधकामे पडणेकामी आदेश दिले आहेत.शेंदुरजणे ग्रामपंचायत हद्दीतील असलेल्या मॅप्रो फुडस कंपनीने केलेल्या वाढीव अनाधिकृत बांधकामाची मोजमापे घेतली असता तब्बल ४२,२७५ चौ.फु. असल्याचे उघड झाले आहे. यापूर्वी सदर कंपनी रु‌.५,४१,१२७ इतकी वार्षिक घरपट्टी भरत होती. त्याबाबत तक्रार आणि उपोषण केल्याने अजून लाखो रुपयांची भर पडली असून ग्रामपंचायतीच्या निधीत वाढ झाली आहे.

मात्र माप्रो कंपनी चे एसटीपी प्लॅन बाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई न केलेले उपोषण या विषयी सुरूच राहणार आहे.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच,सदस्य सातारा,वाईचे गटविकासअधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांनी प्रत्येक तक्रारींची दखल घेतल्याने हा निपटारा झाला असल्याचे सुशांत मोरे यांनी सांगितले.

चौकट -१

अखेर ग्रामसेवक संतोष नाळे यांचे निलंबन

ग्रामपंचायत शिरवली ता. महाबळेश्वर येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असताना संतोष नाळे हे पंचायतीकडे ९ महिने फिरकले नाहीत.मासिक सभा,ग्रामसभा, महिलासभा घेतल्या नाहीत. सरपंचांना कोणतेही रेकॉर्ड दाखविले नाही, त्यांना कोणतीच माहिती न देता परस्पर कामकाज केले.याबाबत सरपंचांनी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी सविस्तर कळवून हि कारवाई केली नाही.मात्र सुशांत मोरे यांनी याबाबत तक्रार दाखल करुन उपोषणाचा इशारा दिला.त्यानंतर मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने कर्तव्यापेक्षा पुढारीपण करणाऱ्या ग्रामसेवक नाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडील सर्व तक्रारीचा निपराट केला असल्याचे सुशांत मोरे यांनी सांगितले.

चौकट -२

जोपर्यंत कारवाई नाही तोपर्यंत उपोषण

अद्याप पर्यंत वाई प्रांत आणि महाबळेश्वर तहसीलदारांनी अनधिकृत बांधकामे पाडणेकामी कोणतीही कारवाई केली नाही. महावितरण,सातारा नगरपरिषद पोलिस अधीक्षक, बँक ऑफ इंडिया,सार्वजनिक बांधकाम विभाग पोवई नाका,शिक्षणाधिकारी प्राथमिक कार्यालयाचे कोणतेही अधिकारी उपोषण दरम्यानभेटले नाहीत की त्यांचे विषयावर कारवाई केली नाही.त्यामुळे सर्व तक्रारीवर कारवाई केली जोपर्यंत कारवाई केली जात नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे सुशांत मोरे यांनी सांगितले.

Adv