(अजित जगताप )
सातारा दि: राजकारणामध्ये निष्ठेला खूप महत्त्व असते वयाच्या १८ व्या वर्षी राजकीय पक्षात प्रवेश करून ७५ व्या वर्षी लोकप्रतिनिधी बनण्याचा मान काही कार्यकर्त्यांना मिळाला पण त्यांनी आपली निष्ठा सोडली नाही. अलीकडच्या काळात ज्यांना महत्वाची पदे मिळतात ते अधिक महत्त्वकांक्षी बनतात पक्ष त्याग करतात. अशा कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घर फिरले तरी घराचे वासे मजबूत असल्याचे सातारा जिल्ह्यात पाहण्यास मिळाले आहे .
आदरणीय जेष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी १९९९ साली म्हणजे २४ वर्षांपूर्वी विदेशी सोनिया गांधी यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षातून निलंबित केले होते. ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार तारीक अन्वर, पी. ए. संगमा या अमर अकबर अँथनी यांनी त्यानंतर त्यांनी सर्वांशी विचार विनिमय करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली . आपले राजकीय दबदबा देश पातळीवर निर्माण केला. आजही भाजप प्रणित केंद्र सरकारला पराभूत करण्यासाठी ८३ वर्षाचे शरदचंद्र पवार साहेब हे जिवाचे रान करत आहेत. परंतु, दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठा गट फुटून आपलं वेगळं अस्तित्व दाखवून देत आहे.
वास्तविक पाहता सातारा जिल्ह्याचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद देणारे खासदार लक्ष्मणराव पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, रामराजे नाईक निंबाळकर ,माजी आमदार भाऊसाहेब गुदगे, ,तुकाराम तुपे, डॉक्टर शालिनीताई पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सदाशिवराव पोळ, श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी, बाळासाहेब भिलारे, सुधीर धुमाळ, प्रकाश गवळी ,राजकुमार पाटील, विमल ताई पाटील, विजया शिंदे दत्ता नाना उत्तेकर, असे रथी महारथी होते. त्याचबरोबर राष्ट्रवादी भवनची निर्मिती केली त्यावेळेला कर्मवीर भाऊराव पाटील जयंती निमित्त दि ९ मे २००३ रोजी सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी भवन नूतन वास्तू उभी राहिली. त्याचे उद्घाघा टन झाले.
या वेळेला ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील, उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ, पाटबंधारे ,फलोत्पादन मंत्री अजित दादा पवार, माजी प्रदेशाध्यक्ष बबनरावजी पाचपुते तसेच विक्रमसिंह पाटणकर ,रामराजे नाईक निंबाळकर आणि राज्यमंत्री मदनराव पिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. आज २४ वर्षांनी विचार केला तर काही नेते दिवंगत झालेले आहेत. तर काहींनी आपल्या सोयीचे राजकारण करून तुम एक मारेंगे तो हम चार मारेंगे अशा पद्धतीने राजकारणामध्ये आपली नीतिमत्ता बदलून टाकलेली आहे. खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह घड्याळ आहे. हे घड्याळ कधी स्थिर नसते प्रत्येकाची वेळ यावी लागते. आणि नव्या शतकाच्या नव्या दिशा असेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ब्रीद वाक्य व बोधचिन्ह आहे. याचा जर विचार केला तर नव्या शतकाच्या नव्या दिशा याची निर्मिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनच झालेले आहे. हे पण आता सूर्यप्रकाश इतके स्वच्छ आहे.
तरीही सातारा जिल्ह्यात आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुरा सांभाळणारी जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष शफीक शेख,विद्यार्थी संघटनेचे अतुल शिंदे ,महिला जिल्हाध्यक्ष संमिंद्रा जाधव, रंजना जगदाळे, त्याचबरोबर अगदी जाणीवपूर्वक उल्लेख करावा. असे आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे सेवा दलाचे प्रकाश यवले ,संघटनेचे पूजा काळे, स्वप्निल वाघमारे, सचिन जाधव व इतर कार्यकर्त्यांचा उल्लेख करावा लागेल .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका गटाची कोल्हापूर येथे बैठकीसाठी राज्याच्या ट्रिपल इंजिनचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे जाणार आहेत.त्यापूर्वी अजित पवार सातारा जिल्ह्यात येत आहे. त्यांच्या स्वागताची सातारा जिल्ह्याच्या प्रवेशद्वारा जवळ मोठी जय्यत तयारी करण्यासाठी माजी पालकमंत्री रामराजे निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांच्यासह अनेक व्यवसायाशी निगडित असलेले कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.