मेरी माटी मेरा देश अभियानाची साताऱ्यातून जोरदार सुरुवात

175
Adv

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून, मेरी माटी मेरा देश हा कार्यक्रम संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात केला जात आहे सातारा जिह्यात या उपक्रमाची सुरुवात श्री क्षेत्र शिवतीर्थ या ठिकाणी करण्यात आली या वेळी खा श्री छ उदयनराजे भोसले,आ श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,आ श्री जयकुमार गोरे,जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम,प्रदेश सचिव श्री भरतनाना पाटील,लोकसभा प्रभारी श्री अतुल भोसले,श्री मनोजदादा घोरपडे,लोकसभा संयोजक श्री सुनील काटकर,प्रमुख विधानसभा संयोजकजिल्ह्यातील सर्व मंडल अध्यक्ष, जिल्हातील सर्व प्रदेश,जिल्हा,मंडल पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते

शिवतीर्थवर श्री छ शिवाजी महाराज यांना वंदन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला सर्व नेत्यांनी कलश पूजन केले त्या ठिकाणची पवित्र माती कलशात घेऊन या उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार आली सर्व नेत्यांनी अमृत कलश हातात घेऊन श्री शिवतीर्थाला प्रदक्षिणा घातली

मेरी माटी मेरा देश विरोंको वंदन माटी को नमन याचा अर्थ हा देश आणि ही माती माझी आहे आणि या देशातल्या विरांना मी नमस्कार करतो या मातीला मी प्रणाम करतो

संपूर्ण भारत आणि त्या मधील माती एकच आहे, आपला देश विविधतेने नटलेला असला तरी आपली मने एकत्र आहेत एक भारत श्रेष्ठ भारत आहे या साठी संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व तालुके आणि जिल्हे या मधून कार्यक्रम होत आहेत,

हे पवित्र माती भरलेले कलश मुंबई येथे एकत्र केले जाणार आहेत,प्रत्येक तालुक्यातून एक कार्यकर्ता हे कलश घेऊन मुंबई येथे जाणार आहे, नंतर हे सर्व कलश घेऊन हे कार्यकर्ते दिल्ली येथे जाऊन मा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे सुपूर्त करणार आहेत, देशभरातून दोन हजार सातशे कलश एकत्र केले जाणार आहेत आणि नवी दिल्ली येथे हुतातम्यांच्या राष्ट्रीय स्मारक परिसरात अमृत वाटीकेत त्या मधील माती ठेवून त्यात देशभरातील विविध वृक्ष लावले जाणार आहेत यातून देश भरातील नागरिकांना एकतेचा संदेश दिला जाणार आहे,त्याच प्रमाणे प्रत्येक ठिकाणी आपल्या देशाला वंदन करण्यासाठी पंचपप्राण शपथ घेण्यात येणार आहे

सातारा जिल्ह्यात या कार्यक्रमासाठी प्रत्येक विधानसभेत एक रथ तयार करण्यात येत आहे, विधानसभेतील ऐतिहासिक, धार्मिक स्थळ किंवा हुतात्मा स्मारके या ठिकाणाहून सुरुवात करून विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक बूथ,बाजारपेठ या ठिकाणावरून हा रथ जाणार असून त्या त्या ठिकाणचे कार्यकर्ते, नागरिक या रथातील कलशांत आपल्या भागातील हुतात्मा स्मारक,ऐतिहासिक ठिकाणे,आजी माजी सैनिक यांची निवासस्थाने, शाळा कॉलेज परिसर, सर्वसामान्य नागरिक यांच्या घरासमोरील, परिसरातील माती गोळा केली जाईल,

सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभेत अकरा सप्टेंबर रोजी या उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार असून पुढचे दहा दिवस संपूर्ण विधानसभा क्षेत्रात हा रथ फिरणार आहे,प्रत्येक विधानसभेचे नेते,मंडल अध्यक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी या यात्रेत उपस्थित असतील अशी माहिती भा ज पा सातारा जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशीलदादा कदम यांनी दिली

Adv