Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City शालेय साहित्य हवयं, फक्त एक फोन करा

शालेय साहित्य हवयं, फक्त एक फोन करा

639
Adv

यंदा शाळांचे सत्र १५ जूनपासून सुरू होत आहे . बदललेल्या पाठ्यकमांच्या रचनेमुळे पुस्तके व इतर साहित्य बाजारात मागणीपेक्षा कमी उपलब्ध आहेत त्यामुळे विलासपूरचे उद्योजक व खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक संग्राम बर्गे मित्र समूहाच्या वतीने विलासपूर गोळीबार मैदान परिसरातील गरजू विद्यार्थ्यासाठी शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे .

या उपक्रमाची टॅगलाईन जिथ कमी तिथ आम्ही अशी ठरवण्यात आली आहे . विलासपूर व गोळीबार मैदान परिसरात प्रमजीवी सामान्य नागरिक मोठया प्रमाणावर वास्तव्य करतात दरवर्षी आपल्या पाल्यांना द्यावयाच्या शैक्षणिक साहित्यांचा खर्च सामान्यांना परवडत नाही ही अडचण संग्राम बर्गे यांनी ओळखूनं गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे त्यांना पाठयपुस्तके दप्तरे इतर शालेय साहित्य संग्राम बर्गे मित्र समूहाच्या वतीने दिले जाणार आहेत यासाठी विद्यार्थ्यांनी 952759 9699 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावयाचा आहे . या उपक्रमाला विलासपूर परिसरात चांगला प्रतिसाद मिळत आहे .

या उपक्रमाविषयी बोलताना संग्राम बर्गे म्हणाले, समाजातील वंचित घटकांना शिक्षणाच्या माध्यमातून विकास करून घेण्याचा हक्क आहे . मात्र परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण सुविधा उपलब्ध होत नाही शिक्षणाचा पाया मजबूत असायला हवा मात्र आजचे शिक्षण महागं झाले आहे . त्यासाठी शालेय साहित्य गरजू विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा युवाशक्ती फाउंडेशनने हा यथाशक्ती प्रयत्नं केला आहे . या सुविधेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संग्राम बर्गे यांनी केले आहे .

Adv