Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City गुन्हेगाराच्या सायरने सातारकर नागरिक हैरान

गुन्हेगाराच्या सायरने सातारकर नागरिक हैरान

204
Adv

गेल्या आठ दिवसात कोयत्याने मारहाण करून हल्ला करण्याचे प्रमाण वाढू लागल्याने साताऱ्यात मंत्र्यांच्या सायरन पेक्षा आता गुन्हेगारीचा सायरन जोरात वाजत असल्याची चर्चा साताऱ्यात सुरू आहे

गेल्या आठ दिवसांमध्ये सातारा शहर परिसरात वाढलेल्या गुन्हेगारीमुळे शांत सातारा अस्वस्थ झाला आहे.सातारा शहरात गेल्या काही महिन्यांमध्ये झालेले कोयता हल्ले,लल्लन जाधव चा पैलवानावर झालेला हल्ला ,फळ विक्रेत्यावर झालेला हल्ला तसेच गांजा विक्रीसह पिस्तूल तस्करीची वाढती प्रकरणे यामुळे शांत सातारा अस्वस्थ झाला आहे या संघटित गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यापुढे यांच्यापुढे आले आहे गुन्हेगारांच्या मुस्क्या वळून पोलीस प्रशासन आपला सायरन वाजवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे

सातार शहरात मंत्र्यांच्या सायरन नंतर गुन्हेगारीचा सायरनच जास्त वाजू लागला असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे त्यामुळे साताऱ्यात गुन्हेगारांचा सायरन रोखायचा असेल तर पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळल्या शिवाय पर्याय नसल्याचे दिसून येते

गुन्हेगारी क्षेत्रात अल्पवयीन मुलांचा वापर ?

गुन्हेगारी क्षेत्रात नव्याने अल्पवयीन मुलांचा वापर करून घेण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे अल्पवयीन मुले घटनेनंतर रिमांड होम मध्ये पाठवली जातात पण जेव्हा ती तेथून बाहेर पडतात त्यावेळी त्यांच्यावर कोणाचेही प्रत्यक्ष नियंत्रण राहत नाही बाल सुधार सुरक्षा समितीचे काम जरी सुरू असले तरी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांना मॉनिटर करणे गरजेचे असताना ते काम अपुऱ्या मनुष्यबळावी प्रभावीपणे होताना दिसत नाही .

Adv