Monday, April 20, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City मुख्याधिकारी साहेब अतिक्रमण केलेल्या पेट्रोल पंपाची जागा ताब्यात घेऊन लीलाव प्रक्रिया राबवा

मुख्याधिकारी साहेब अतिक्रमण केलेल्या पेट्रोल पंपाची जागा ताब्यात घेऊन लीलाव प्रक्रिया राबवा

356
Adv

सातारा पालिकेचा महसूल बुडवून पालिकेच्या जागेत अतिक्रमण असलेल्या जुना मोटर स्टँड येथील पेट्रोल पंपाचा भाडेपट्टी चा करार संपला असून मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी ती जागा ताब्यात घेऊन सदरच्या जागेची लिलाव प्रक्रिया राबवावी अशी मागणी सातारकर जनतेतून होत आहे

जुना मोटर स्टँड येथील पेट्रोल पंप गेल्या अनेक वर्षापासून हे पालिकेचा जागेत अतिक्रमण करून बिनधास्तपणे आपला व्यवसाय करत आहेत या व्यवसायातून त्यांनी कोट्यावधीची माया जमवली असल्याचे समजते सदरची जागा ही सातारा पालिकेची मिळकत असून मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी या जागेचा ताबा घेऊन याची लिलाव प्रक्रिया राबवावी अशी मागणी आता सातारकर जनतेतून होऊ लागली आहे

पालिका दंड करण्याच्या तयारीत

सातारा पालिका जुना मोटर स्टँड येथील त्या पेट्रोल पंपांवर दंड करण्याच्या तयारीत असून दंड हा केलाच पाहिजे दंड करून या जागेची लिलाव प्रक्रिया राबवावी तरच आपले प्रशासन पारदर्शक असल्याचे दिसून येईल अन्यथा अतिक्रमण करणाऱ्यांचे लाड सातारा पालिका करते हे दिसून येईल

क्रमश

Adv