Friday, May 1, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City बेकायदेशीर कनेक्शनचा साताऱ्यात सुळसुळाट

बेकायदेशीर कनेक्शनचा साताऱ्यात सुळसुळाट

41
Adv

सातारा शहरात बेकायदेशीर पाण्याच्या कनेक्शनचा सुळसुळाट झाला असून पाणीपुरवठा सभापती दत्तात्रय बनकर कनेक्शन देणाऱ्यांवर भव्य बघायची भूमिका घेणार की कारवाई करणार हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे

सर्वसामान्य सातारकर नागरिक पाणीपट्टी घरपट्टी व्यवस्थित रित्या भरतात मात्र साताऱ्यातील काही घरांमध्ये बोगस कनेक्शन चा सुळसुळाट असून सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यानंतर शुक्रवार पेठ येथे बोगस नळ कनेक्शन आढळली त्यातील काहींना पालिकेने दंड भरून नियमित केली मात्र ही दंडाची रक्कम फार कमी होती त्यामुळे गुन्हा करणाऱ्यांना एक प्रकारे न्यायच पालिका देत असल्याचे चित्र दिसून येते

शुक्रवार पेठ मंगळवार पेठ यादव गोपाळ पेठ शनिवार पेठ या भागात प्रचंड बेकायदेशीर कनेक्शनचा सुळसुळाट असून पाणीपुरवठा सभापती दत्तात्रय बनकर यांनी या सर्व बोगस कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी कर भरणारे सर्वसामान्य सातारकर नागरिक करत असून नक्की पाणीपुरवठा सभापती कारवाई करणार की बघायची भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे

Adv