सहकार पॅनेलचा दणदणीत विजय..

245
Adv

सातारा – सातारा जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवत प्रभाकर साबळे यांच्या सहकार विकास पॅनेलचा सुपडासाफ केला. सहकार पॅनेलप्रमुख विनोद कुलकर्णी, अविनाश कदम यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने फेडरेशनच्या राजकारणात करिष्मा कायम ठेवत १९-० असा विजय मिळवला. फेडरेशनच्या निवडणुकीसाठी गुरुवार दि. १९ रोजी मतदान झाले. यासाठी एकूण २८४ मतदार होते. मतदान शंभर टक्के झाले होते. मतदानानंतर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनच्या हॉलमध्ये मतमोजणी झाली. या मतमोजणीत १४ मते बाद ठरली तर २७० मते वैध ठरली. सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी जवळपास १०० ते १५० मतांच्या फरकाने विजय मिळवला. विजयानंतर सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी एकच जल्लोष करत गुलालाची उधळण केली.

या निवडणुकीत सहकार पॅनेलला कपबशी चिन्ह होते. मतदानापूर्वी सहकार पॅनेलने सर्व मतदारांपर्यंत जनजागृती करुन जोमाने प्रचार केला होता. निवडणुकीत सहकार पॅनेलचे विजयी झालेले उमेदवार आणि त्यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे – सर्वसाधारण मतदारसंघ – कदम अविनाश नानासाहेब (२०३), कुलकर्णी विनोद सुर्यनारायण (१९५), पोळ सुनिल वाघोजीराव (१९५), मोरे व्यंकटराव सर्जेराव (१९३), पवार दत्तात्रय जयसिंगराव (१९२), बावळेकर दिलीप कोडींबा (१८९), जाधव राजेंद्रकुमार माधवराव (१८६), निंबाळकर अनिलराज अनंतराव (१८४), फडतरे कांत नारायण (१८३), चिटणीस शिरीष शरद (१८२), साळुंखे सागर सोपान (१८०), पवार शशिकांत निवृत्ती (१७७), शिंदे संपत आनंदा (१७१), सत्रे दादासो प्रकाश (१६६), महिला राखीव मतदारसंघातून पवार अंजली अंजिक्य (१९९), मोरे पुण्यशिला सुरेशराव (१९४), विमुक्त जाती-भटक्या जमती तथा विशेष मागास प्रवर्ग राखीव मतदारसंघातून हाके नानासाहेब रामचंद्र (२०५), इतर मागास प्रवर्गातून कासार हेमंत(हेमचंद्र)चंद्रकांत (२०४), अनुसूचित जाती-जमाती राखीव मतदारसंघातून कारंडे सागर रामराव (१९३). तर सहकार विकास पॅनेलच्या पराभूत उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे – सर्वसाधारण मतदारसंघ -ओसवाल बिपीन मोहनलाल (७६), कारंडे सागर रामराव (०६), गवळी दिलीप कोंडीराम (६९), गाढवे श्रीराम बाबुराव (७२), गुंडगे भास्करराव वामनराव (८८), जमदाडे सुनील गोपाळ (६५), दोशी नितीन सुभाषचंद्र (८४), पाटील दत्तात्रय रघुनाथ (६६), बाजारे महेंद्र प्रभाकर (०३), मोहिते विक्रमसिंह प्रतापराव (८४), यादव प्रताप ज्ञानेश्वर (८६), शिंदे सुरेश दादू (०२), शेळके गणपतराव साहेबराव (७०), संकुडे सुरेश विठ्ठल (५८), साबळे प्रभाकर सदाशिव (१०६), साळुंखे गणपतराव गोविंदराव (६१), अनुसूचित जाती-जमाती राखीव मतदारसंघ – खुडे सुभाष तात्याबा (८४), इतर मागास प्रवर्ग – संदे यासीन दस्तगीर (७७), विमुक्त जाती-भटक्या जमाती तथा विशेष मागास प्रवर्ग -आटोळे धनाजी निवृत्ती (७६), महिला राखीव मतदारसंघ – महाडिक धनश्री राजेंद्र (९०), यादव सुनंदा प्रतापराव (७१).
सहकर पॅनेलच्या विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. त्यानंतर सर्वांनी शिवतीर्थावरील श्री.छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सातारची अर्थवाहिनी असणाऱ्या जनता सहकारी बँकेत सहकार पॅनेलच्या पॅनेलप्रमुख आणि विजयी उमेदवारांचे जनता सहकारी बँकेचे चेअरमन अमोल मोहिते, ज्येष्ठ संचालक जयेंद्र चव्हाण, संचालक, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरुची या निवासस्थानी भेट दिली. येणाऱ्या काळात अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून जिल्हयातील पतसंस्था चळवळ आदर्श आणि देशाला दिशा देणारी असेल असे काम करु असा विश्वास पॅनेलप्रमुख विनोद कुलकर्णी, अविनाश कदम यांनी व्यक्त केला. या विजयाबद्दल सहकार पॅनेलच्या उमेदवारांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

चौकट
जिल्हयातील नेत्यांची दमदार साथ
सहकार पॅनेलला विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले,आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, ॲड. उदयसिंह पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, प्रभाकर देशमुख, श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई या नेत्यांनी दमदार साथ दिली. या नेत्यांच्या पाठिंब्यावरच सहकार पॅनेलचा दणदणीत आणि सणसणीत विजय झाला आहे.

चौकट –
कुलकर्णी – कदमांचा करिष्मा कायम
सहकार पॅनेलचे पॅनेलप्रमुख विनोद कुलकर्णी आणि अविनाश कदम यांच्या योग्य नियोजनाचा फायदा पॅनेल विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी केला होता. त्यांनी केलेले डावपेच यशस्वी ठरले आहेत. मतदारांना त्यांनी घातलेली साद मोठ्या प्रमाणात विक्रमी विजयाची नांदी ठरली आहे. पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी त्यांना जबरदस्त अशी साथ दिली. पॅनेलमध्ये असलेला एकसंघपणा मोठ्या विजयाचे गमक ठरले आहे. फेडरेशनच्या राजकारणात कुलकर्णी- कदमांचा करिष्मा कायम राहिला आहे.

Adv