छ उदयनराजे यांच्या सूचनेनुसार शहरासह हद्दवाडीतील भाग होणार पूर्ण सैनीटाईज उपाध्यक्ष शेंडे

321
Adv

खा श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार सातारा शहरासह हद्दवाडीतील संपूर्ण भाग पूर्ण सैनीटाईज व फॉगिंग मशीन ने स्वच्छ करणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी सातारानामाशी बोलताना दिली

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून सातारा पालिकेच्या माध्यमातून संपूर्ण सातारा शहर तसेच हद्दवाडीतील संपूर्ण एरिया हा सैनी टाईज करून फॉगिंग मशीनच्या द्वारे स्वच्छ करणार असून प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 20 असा ऐरीया प्रथम सैनीटाईज होणार असून प्रभाग क्रमांक 20 ते प्रभाग क्रमांक 1 असा एरिया फॉगिंग मशीन ने फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार आम्ही गेल्या चार दिवसापासून सातारा शहर सैनीटाईज करत असून कोरोना चा प्रादुर्भाव शहरात कसा रोखता येईल याचेही नियोजन आम्ही करत असल्याची माहिती सातारा शहराचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली

Adv