Monday, April 20, 2026
spot_img
Home Satara District जिल्हयातील पतसंस्था आणि बँकेमध्ये कार्यरत असणाऱ्यांचे तातडीने लसीकरण करा विनोद कुलकर्णी

जिल्हयातील पतसंस्था आणि बँकेमध्ये कार्यरत असणाऱ्यांचे तातडीने लसीकरण करा विनोद कुलकर्णी

398
Adv

कोरोनाच्या संकटात फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून बँका आणि पतसंस्थांच्या कर्मचा-यांनी काम केले. त्याचे लसीकरण करण्यात यावे याबाबत 20 एप्रिल रोजी राज्य सहकार आयुक्तांनी सर्व जिल्हाधिका-यांना आदेश दिले होते परंतु सातारा जिल्हयात याबाबत कार्यवाही न झाल्याने सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक आणि जनता सहकारी बँकेच्या भागधारक पॅनेलचे प्रमुख विनोद कुलकर्णी याबाबत कार्यवाही न झाल्यास जिल्हा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाव्दारे पालकमंत्री, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना दिला होता, याची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी जिल्हाधिका-यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात, कोरोनाच्या संकटात फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून बँका आणि पतसंस्थांच्या कर्मचा-यांनी काम केले आहे. त्यांना फिल्डवर राहूनच लोकांना सेवा द्यावी लागली आहे. दुर्देवाने केंद्र सरकार आणि राज्यसरकार यांनी सर्व कर्मचा-यांचा लसीकरण कार्यक्रमात समावेश केला. परंतु बँका आणि पतसंस्था यांच्या कर्मचा-यांकडे दुर्लक्ष केले. त्यांना सापत्न वागणूक दिली, त्यामुळे अनेक कर्मचा-यांना कोरोना रोगाचा प्रादुर्भाव झाला. राज्यातील शेकडो कर्मचा-यांचा मृत्यूही झाला. राज्य सरकारच्या ब्रेक दी चेन आदेशान्वये सर्व बँका व पतसंस्था आजही कार्यरत आहेत. सहकारी बँका व पतसंस्था या नागरिकांच्या आर्थिक बाबींशी निगडीत असल्याने यामधील कर्मचा-यांचा शासकीय कर्मचा-यांप्रमाणे सामान्य जनतेशी अधिक संपर्क येतो. त्यामुळे त्यांना मोठया प्रमाणावर कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सहकारी बँका व पतसंस्था या राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे नागरिकांची आर्थिक गैरसोय टाळण्यासाठी सद्यस्थितीत कार्यरत असल्याने त्यामध्ये काम करणा-या अधिकारी व कर्मचा-यांची लसीकरण करणेबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी. त्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे यांनी दि. 20 एप्रिल रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांना लसीकरणाबाबत आदेश दिले आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी तातडीने सातारा जिल्हयात करावी अन्यथा तीव्र आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. याबाबत चार दिवसात निर्णय न झाल्यास बँका आणि पतसंस्थांच्या कर्मचारी व संचालकांना घेऊन जिल्हा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला होता. या निवेदनाची पालकमंत्री व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी त्वरित दखल घेऊन जिल्हाधिका-यांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात आदेश दिले आहेत, अशी माहितीही जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक आणि जनता सहकारी बँकेच्या भागधारक पॅनेलचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी दिली आहे.

Adv