Monday, April 20, 2026
spot_img
Home Satara District जिल्ह्यात उद्योगांनी कोविड केअर सेंटर उभे करावे खा छ उदयनराजे भोसले यांची...

जिल्ह्यात उद्योगांनी कोविड केअर सेंटर उभे करावे खा छ उदयनराजे भोसले यांची प्रशासनाला सूचना

277
Adv

सातारा जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर जिल्हयातील उद्योगांनी सामाजिक दायीत्व निधीचा (CSR) विनीयोग करुन कोबिड उपचारासाठी दवाखाना उभा करावा.
यासंदर्भात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पुढाकराने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील SEZ आणि D Zone चा फायदा घेतलेल्या कंपन्यांची बॅलन्स शिट प्रभारी जिल्हाधिकारी श्री.रामचंद्र शिंदे यांनी मागवाव्यात तसेच कायदयाने अनिवार्य
असलेल्या सामाजिक दायित्व निधी (CSR) मधुन सातारा जिल्हयातील नागरिकांसाठी कोविड़ उपचारासाठी दवाखाना उभा करावा अशा सुचना प्रभारी जिल्हाधिकारी यांना केल्या .
त्या उदयोगांच्या बॅलन्य शिट पुढील बैठकीत बरोबर घेऊन, महाराष्ट्र राज्य आंदयोगिक मंडळाचे अधिकारी, कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक लवकर घेण्यात यावी अशा सुचना प्रभारी जिल्हाधिकारी यांना केली.

तसेच कंपन्या हा खर्च करुन स्थानिक नागरिकांवर उपकार करत नसुन ते त्यांना कायदेने बंधनकारक आहे. जर या निधी मधुन स्थानिक जनतेसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिली नाही तर कंपन्यानी शासकीय योजनांचा आतापर्यंत घेतलेला फायदा याचा हिशोब करुन त्यासंदर्भात वेगळा विचार करावा लागेल असा इशारा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बैठकीत दिला. यावेळी बैठकीला तालुक्यातील विविध मान्यवर व नागरिक उपस्थित होते

Adv