दुचाकी वाहनासाठी एमएच-11 डी.डब्ल्यु मालिका सुरु

153
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
Adv

दुचाकी वाहनासाठी डी.डब्ल्यु ही 0001 ते 9999 क्रमांकापर्यंतची नवीन मालिका प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरु करण्यात येत आहे. तरी इच्छुक वाहन धारक या मालिकेतील आकर्षक क्रमांक शासकीय नियमानुसार फी भरुन आरक्षित करु शकतील. दुचाकी मालिकेतील क्रमांक इतर वाहनांसाठी हवा असल्यास नियमानुसार तिप्पट फी भरुन नोंदणी क्रमांक देण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

29 एप्रिल रोजी आर्षक क्रमांकासाठी सकाळी 10 वाजलेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत धनाकर्षासह स्विकारले जातील. एकापेक्षा अधिक अर्जदारांनी पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी अर्ज केल्यास अशा प्रकरणात अर्जदारास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जादा रकमेचे धनाकर्ष बंद लिफाफ्यात सादर करणे आवश्यक आहे. जो अर्जदार सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करेल त्यास पसंतीचा क्रमांक देण्यात येईल. उर्वरीत अर्जदारांना धनाकर्ष त्वरीत परत देण्यात येतील.

आकर्षक नंबर आरक्षित केल्यानंतर 180 दिवसांच्या आत वाहन धारकांनी वाहनाची नोंदणी करणे बंधनकारक आहे, असेही प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Adv