Thursday, April 23, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज पाटील याला मिळणार बुलेट भेट सुनिल काटकर यांची...

महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज पाटील याला मिळणार बुलेट भेट सुनिल काटकर यांची माहिती

506
Adv

सातारा दिनांक 10 प्रतिनिधी महाराष्ट्र केसरी विजेता कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील यांना खासदार श्री छ उदयनराजे भोसले यांनी अनोखी गिफ्ट दिले आहे मानाची चांदीची गदा पटकावणाऱ्या पृथ्वीराज उदयनराजे यांच्या वतीने दमदार अशी बुलेट बाईक भेट देण्यात येणार आहे याची माहिती श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज तालीम संघाचे उपाध्यक्ष व माजी शिक्षण सभापती सुनील काटकर यांनी दिली

कोल्हापूरचे पैलवान पृथ्वीराज पाटील यांनी मुंबईच्या विशाल बनकर याच्यावर चार विरुद्ध पाच धावांच्या फरकाने मात केली होती आणि चांदीची गदा पटकावत 19 वर्षे पैलवानाने कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीचा मान मिळवून दिला त्याच्या या कामगिरीची दखल घेत खासदार श्री छ उदयनराजे भोसले यांनी पृथ्वीराज पाटील यांचे विशेष अभिनंदन करत त्याला चक्क साडेतीनशे सीसीची एनफिल्ड बुलेट गिफ्ट देण्याचे नियोजन केले आहे एनफिल्ड बुलेट पृथ्वीराज याला लवकरच प्रदान केली जाणार आहे अंतिम लढतीत केलेल्या चितपट धावांचे उदयनराजे भोसले यांनी विशेष कौतुक केले माजी शिक्षण सभापती सुनील काटकर यांनी उदयनराजे यांनी दिलेल्या वेगळ्या गिफ्टची माहिती पत्रकारांना दिली

Adv