Monday, April 20, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City यंदा प्रवेश प्रक्रिया राबवा अन्यथा उत्तरे द्यावी लागतील खा उदयनराजे भोसले...

यंदा प्रवेश प्रक्रिया राबवा अन्यथा उत्तरे द्यावी लागतील खा उदयनराजे भोसले यांच्या वैद्यकीय अधिष्ठात्यांना सूचना

574
Adv

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सुरु होण्याच्या दृष्टीने, सर्व साधारण रुग्णालयालगत उभारण्यात येत असलेल्या विविध सुविधांची म्हणजेच दोन लेक्चर हॉल,लॅबोरेटरी,डिसेक्शन हॉल
आणि पहिल्या मजल्यावर लायब्ररी, डेमो रुम, एचओडी रुम्स, इत्यादी कामांची पहाणी आज खा श्री छ उदयनराजे भोसले यांनी केली. यावेळी या महाविद्यालय यंदाची प्रवेश प्रक्रीया सुरळीत सुरु झाली पाहीजे त्या दृष्टीने सर्वांनीच योगदान दयावे असे मत खा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारा सिव्हील हॉस्पिटलच्या परिसरातील वैद्यकिय महाविद्यालयाच्या उपलब्ध सुविधांची पहाणी केली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.रविंद्र चव्हाण,उपअधिष्ठाता डॉ.श्री.संजय गायकवाड,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण,प्रमुख उपस्थित होते.शासकीय वैद्यकियमहाविद्यालयाच्या मंजूरी करीता आणि उभारणीकरीता आज पर्यंत अनेकअडथळे आले तरी देखिल अनेकांचे सहकार्य देखिल लाभलेले आहे. कोणत्याही परिस्थितीत यंदाच्या वैद्यकिय शिक्षण प्रवेश प्रक्रीया सुरळीत सुरु होणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य विज्ञान परिषद,राज्यशासन आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाता,(डिन) यांच्या संयुक्त प्रयत्नातुन.आतापुढील प्रवेश कार्यबाही होणे अपेक्षित आहे. त्यासाठी आमचे लागेल ते सहकार्य राहीले आहे आणि यापुढेही राहणार आहे.तसेच प्रयोगशाळा इमारतीच्या जागेची पहाणी केली. नवीन स्त्री रुग्णालयाला आवश्यक असणारी मुबलक जागा, सिव्हील रुग्णालयाच्या परिसरातच सुमारे ४६ गुंठे उपलब्ध आहे त्या
ठिकाणी नवीन स्त्री रुग्णालय उभारणेबाबत सूचित करून त्याही जागेची पहाणीही यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली. कोणत्याही प्रशासकीय कारणास्तव यंदाची प्रवेश प्रक्रीया रखडली गेली तर त्याबाबत संबंधीतांना जाब द्यावा लागेल, आता सर्व सोपस्कार पूर्ण झाले असल्याने, आता आम्हाला यंदापासून प्रवेश प्रक्रीया सुरु झालेली पाहीजे असे नमुद करून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महाविद्यालयाच्या उपयोगी असणा-या विविध सुविधांची पहाणी करुन, समाधान व्यक्त केले आहे.यावेळी काका धुमाळ,सचिन नलवडे,उपअभियंता खाई बांधकामचे श्री.अहिरे आंबेकर,यांचे सह वैद्यकिय महाविद्यालयाचे प्राध्यापक, सिव्हील हॉस्पिटलचे अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Adv