उत्कृष्ट लोकसहभाग प्रशासनाचा समन्वय अपारंपारिक ऊर्जा साधनांचा वापर वृक्ष लागवडीसह स्वच्छतेचा काटेकोर आग्रह यामुळे सातारा पालिकेने माझी वसुंधरा अभियानामध्ये पुणे विभागात राज्यस्तरावर पहिला क्रमांक पटकावला आहे .सातारा पालिकेलाप्रथम क्रमांकाचे सहा कोटीचे बक्षीस जाहीर झाले आहे .सातारा पालिकेच्या यादव देशाचे लोकप्रतिनिधी खासदार छ उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अभिनंदन केले आहे
सातारा नगरपालिकेने यापूर्वी माजी वसुंधरा अभियानात सातत्यपूर्ण कामगिरी केली होती .मात्र 2026 मध्ये जास्तीत जास्त लोकसहभागातून उपक्रम राबवून सातारा पालिकेने कार्बन शून्य वातावरण अपारंपारिक ऊर्जा साधनांचा वापर जल पुनर्भरण पर्यावरण समृद्ध तिच्या दृष्टीने विशेष प्रयत्न वृक्षारोपण अशा विविध माध्यमातून पुणे विभागामध्ये अवल क्रमांक पटकावला .राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या वतीने माजी वसुंधरा पाच अभियानाचा निकाल मंगळवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले सातारा नगरपालिकेने एक ते तीन लाख लोकसंख्येच्या गटात सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला .
साताऱ्यासह 15 हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पाचगणी पालिकेने प्रथम महाबळेश्वर पालिकेने दुसरा क्रमांक पटकावला तर दहिवडी नगरपंचायतीने 15 ते 25000 लोकसंख्येच्या गटात माजी वसुंधरा अभियानात राज्यात तिसरा क्रमांक पटकावला .






