सर्वात पहिल्यांदा नगरपालिका कि जिल्हा परिषदेची निवडणूक याकडे लागले लक्ष

66
Adv

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात येत्या चार आठवड्यात अधिसूचना काढण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून येत्या दिवाळीपर्यंत या निवडणुका उरकल्या जातील असा अंदाज आहे

यामध्ये जिल्हा परिषदपंचायत समिती महानगरपालिका आणि नगरपालिकाअशी क्रमवारी ठरवून तसा निवडणूक कार्यक्रम राजे निवडणूक आयोगाला जाहीर करावा लागणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय वर्दळ वाढणार असून त्या दृष्टीने मोर्चे बांधणी सुरू झाली आहे ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे महाराष्ट्रात 2021 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडून पडल्या आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती एनकेसीह यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे निर्देश दिले 2022 च्याआधीचे आरक्षण इतर मागास प्रवर्गाला निर्देशित झाल्यामुळे सातारा जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गांना 27%आरक्षण निश्चित झाले आहे सातारा पालिकेमध्ये सुद्धा ओबीसी आरक्षणाचे तब्बल तेरा वॉर्ड असणार आहेत सातारा कराड वाई फलटण रहिमतपूर मलकापूर महाबळेश्वर म्हसवड पाचगणीया स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यभार गेल्या तीन वर्षापासून प्रशासकांकडे आहे आता फक्त प्रभाग रचना यासंदर्भात राज्य निवडणूक आयोग काय निर्देश देणार यावर बरीचशी गणित अवलंबून असताना आहे मुंबई महापालिका अनुकूल करण्याच्या दृष्टीने राज्य शासनानेबरीच राजकीय राजकीय मोर्चा बांधणी केली होती 22 जुलै 2022 रोजी जिल्ह्यातील आरक्षणे व वाढ निश्चिती सुद्धा झाली होती

मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयात आव्हान मिळाल्याने या सर्वच प्रक्रियांना स्थगिती मिळाली तेव्हापासून निवडणुकांचा कार्यक्रमच स्थगित झाला होता राज्य निवडणूकआयोगाला अधिसूचना काढल्यानंतर राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर करावा लागणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौंडी येथे राज्य शासनाच्या अधिवेशन प्रक्रियेतमहायुती एकत्र लढण्यासंदर्भात संकेत दिले आहेत मात्र एखाद्या ठिकाणी वेगळा स्थानिक निर्णय होऊ शकतो असेही त्यांनी निर्देशित केले आहेतसातारा जिल्ह्यामध्ये महायुतीतील भाजपचे चार शिंदे गटाचे दोन व राष्ट्रवादी गटाचे दोन आमदार आहेत राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागला होता यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचे पारडे जड राहणार आहे सातारा जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अप्रवर्गातील सातारा नगरपालिकेत आता खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा विकास आघाडी की सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची नगर विकास आघाडी हे समोरासमोर की मनोमिलन याही राजकीय प्रश्नांची उत्तरे नजीकच्या कालावधीत मिळणार आहेत सातारा जिल्ह्यामध्ये निवडणूक आयोजन निर्देशामुळे राजकीय गहमा कमी वाढणार असून येता पावसाळा हा राजकीय हालचालींनी चिंब असणारा असल्याची चिन्हे आहेत

Adv