कृषी प्रदर्शनाचे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्त

226
Adv

सातारा 19…स्मार्ट एक्स्पो ग्रुप च्या व्यवस्थापन अन्तर्गत व मा.श्रीमंत छ. उदयन राजे भोसले मित्र समूह , जय सोशल फौंडेशन चे वतीने छत्रपती कृषी 2023भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन कृषी,औद्योगिक, वाहन व पशु पक्षी प्रदर्शन 2023 चे स्मार्ट एक्सपो यांच्यावतीने आयोजित केलेल्या सातारा जिल्हा परिषद मैदानावरील छत्रपती कृषी औद्योगिक वाहन महोत्सव चे उद्घाटन सोहळ्यास सातारा जिल्ह्याचे लाडके खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उद्घाटक म्हणून उपस्थित राहून या सोहळ्यासाठी आलेल्या हजारो सातारकरांचा आनंद द्विगुणित केला.या छत्रपती महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ज्येष्ठ कृषी तज्ञ आणि कृषी क्षेत्रातील मार्गदर्शक डॉ. बुधाजीराव मुळीक, माजी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष व आमदार आनंदराव पाटील . माजी जि प शिक्षण सभापती सुनील काटकर,स्मार्ट एक्सपोर्टचे प्रमुख संयोजक सोमनाथ शेटे जय सोशल फाउंडेशन चे सागर भोसले यांचे सह जिल्हा कृषी अधीक्षक सौ.भाग्यश्री फरांदे,उपविभागीय कृषी अधिकारी गुरुदास काळे ,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री. परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी ,कृषी विकास अधिकारी विजय माइणकर ,,संग्राम बर्गे, काका धुमाळ,विविध शेती तसेच पशु विभागाचे मान्यवर अधिकारी जय सोशल फाउंडेशनचे क्रियाशील सदस्य कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.भारत सरकारच्या वतीने 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले असल्यामुळे या प्रदर्शनाच्या अग्रभागी जागर पौष्टिक तृणधान्य यांचा हे साकारलेले विविध तृणधान्यांचे प्रदर्शनही लक्षवेधक ठरत आहे.तब्बल 225 हून अधिक नामवंत देशातील कंपन्यांच्या विक्री स्टॉल मध्ये सहभाग असलेले या महोत्सवासाठी पुढील पाच दिवस सातारकरांना एक परवणीच लाभली आहे.उद्घाटन सोहळ्यात त श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी फित कापून या प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यावर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना उदयनराजे भोसले म्हणाले की,उद्घाटन केल्यानंतर मार्गदर्शन करताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की शेतकऱ्यांसाठी जेवढे करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करत आहे भारतात तयार झालेली उत्पादने भारतातच विक्री होणे गरजेचे आहे असा हा प्रदर्शनाचा स्तुत्य उपक्रम कौतुकास पात्र आहे अशा प्रदर्शनातूनच उत्पादने विक्री होऊन देश प्रगतीवर जाईल देशाला महासत्ता बनवण्यासाठी शेतकऱ्याला सधन करणे गरजेचे आहे अन्यथा देश अधोगतीला जाईल डॉक्टर बुधाजीराव मुळीक यांचे शेतीचे ज्ञान अफाट आहे डॉक्टरांसारख्या आयुष्य वेचलेल्या आणि वाहून घेतलेल्या निस्वार्थी आणि या मोठ्या माणसांना मोठ्या प्रमाणावर मोठी पदे येऊन नेमणूक होणे गरजेचे आहे त्यांच्या पदाच्या माध्यमातून देशाचे कल्याणच होईल आणि देशाला मिळणारे योगदान हे मोलाचे असेल त्यांच्या कार्याचा वर्णन शब्दात करता येणार नाही माझ्या वयापेक्षा जास्त वर्ष त्यांनी शेतकऱ्यांसाठी दिली आहे देव जर पाहायचं असेल तर डॉक्टर बुधाजीराव मुळीक यांच्यासारख्या रूपातच पाहता येईल आज शेतकऱ्यांची कुटुंबे सदन होणे हे अतिशय गरजेचे आहे.हे प्रदर्शन आपणा सर्वांसाठी खरोखरच मार्गदर्शक ठरेल व यातून आपल्याला नवनवीन विकास आणि तंत्रज्ञानाची ओळख होईल. यावेळी बोलताना डॉ. बुधाजीराव मुळीक म्हणाले की स्वतःला अशा राजाकडून काय काम करून घ्यायचे हे कळले पाहिजे राजांसारखी माणसे आहेत जी कुठलेही काम करण्यासाठी न भिता मागेपुढे पाहता त्यांची दारे सर्वांसाठी सर्व प्रश्नांसाठी उघडी आहेत देशात न्याय देणारा जर कोण असेल तर उदयनराजे सारखा माणूस शोधून सापडणार नाही ते कोठेही असो त्यांची दारी आपल्या सर्वांच्या प्रश्नासाठी सदैव उघडी असतात छत्रपती शिवरायांच्या राजघराण्यात आज त्यांच्यानंतर उदयनराजेंचेच नाव घेतले जाते .सातारा ही स्वच्छ नगरी होणे अपेक्षित आहे विना प्लॅस्टिक नगरी झाली तर जेवढे नागरिक चांगले वागतील तेवढा देश सुधारेल उदयनराजे यांच्या मोठ्या कार्यकर्तृत्वामुळे पुणे ते मिरज ही रेल्वे विद्युतीकरण होऊन पुणे ते कागल हा सहा पदरी झाला राजांकडून काय करून घ्यायचे हे कळले पाहिजे इस्पिकचा हा हुकमी एक्का आहे जो भारतात आपल्याला कोठेही शोधून सापडणार नाही सर्व जात धर्म आणि प्रांतामध्ये शिवाजी महाराजांचे नाव माहित नाही असे कोणी नाही तसाच प्रकार उदयनराजेंचा आहे तुम्ही लोक प्रेम करतात आणि असा तुमचा लोकप्रतिनिधी हा खरोखरच कौतुकास पात्र आहेयावेळी युवा नेते संग्राम बर्गे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रभावी तंत्रज्ञानाची कमाल असलेला खते ,औषधे स्प्रिंकलिंग करणारा स्वयंचलित ड्रोन या प्रदर्शन महोत्सवाचे आकर्षण आहे तसेच कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील दीड टन वजनाचा गजेंद्र हा सहा वर्षाचा रेडा या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे,कार्यक्रम संयोजक सोमनाथ शेटे, रेखा शेटे व हेमलता भोसले यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मोरे यांनी अतिशय प्रभावीपणे केले.
छत्रपती कृषी महोत्सवांमध्ये दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता डॉ. सुभाष गोष्टी यांचा हिप्नॉटिझम हा खेळ मनामनांचा कार्यक्रम सादर होणार असून दिनांक 21 व 22 ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजता सरगम पूजन म्युझिक यांचा वाद्य संगीताचा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे

Adv