Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City काय सांगतोय दादा भाजपमध्ये आहेत तरी किती गट

काय सांगतोय दादा भाजपमध्ये आहेत तरी किती गट

596
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

येत्या 9 तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सातारा शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेअसून भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयाच्याभूमिपूजनाचेही नियोजन यावेळी करण्यात आले असून या जागेची पाहणी ठराविक नेते व पदाधिकाऱ्यांनी केल्याने जिल्ह्यात भाजपचे गट तरी किती अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिनांक 9 रोजी सातारा शहरात विविध भूमिपूजनासाठी येणार असून भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन हस्ते होणार असून या जागेची पाहणी जिल्हाध्यक्षांनी काही ठराविक नेत्यांबरोबर केली यात गैर नसले तरी शासकीय विश्रामगृह येथे तब्बल एक तास झालेल्या 1 तास मिटिंग मध्ये जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते जिल्हाध्यक्ष व विविध पदाधिकारी उपस्थित होते हेच पदाधिकारी नेते पाहणी करण्यास दिसत नसल्याने भारतीय जनता पार्टीमध्ये गटतरी किती असे चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे

भारतीय जनता पार्टी जिल्ह्याची कार्यकारी या ना त्याकारणाने चांगलीच चर्चेत राहत असून जर भारतीय जनता पार्टीमध्ये गडतट निर्माण झाले असतील तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला ही धोक्याची घंटाच म्हणावी लागेल

Adv