प्रशासकीय इमारतीच्या गौण खनिजाची रॉयल्टी टीएनटी कंपनीकडून वसूल करावी

247
Adv

सदर बाजार येथे सातारा पालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे काम सुरू आहे. या कामानिमित्त ठेकेदार टी अँड टी कंपनीने उत्खनन केलेले गौण खनिज संबंधित कंपनीने परस्पर विकल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केला आहे या कंपनीवर व तो विकत घेणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित कंपनीकडून रॉयल्टी वसूल करण्यात यावी अशी मागणी मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे

ज्यादा उत्खनन केलेल्या दगडाची रॉयल्टी शासनाला भरण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र देखील त्यांनी सातारा नगरपालिकेला सादर केले आहे यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार नमूद आहे की टी अँड टी कंपनीने प्रशासकीय इमारतीचे उत्खनन करताना त्याचे गौण खनिज एका ठेकेदाराला विकले असून कंपनीने फसवणूक करून हा दगड त्यांना दिला आहे .मोठ्या प्रमाणात तो दगड बाजारात विकला गेला आहे कोट्यवधीची रॉयल्टी बुडवून सरकारचे नुकसान करण्यात आले आहे .सातारा नगर परिषदेने या प्रकरणाची गंभीर दखल घेणे गरजेचे होते .टीएनटी कंपनी सध्या सातारा नगर परिषदेची मालकी आहे काही केले तरी आपल्याला काही दंड होत नाही अशा भावनेने ही कंपनी काम करत आहे एवढ्या मोठ्या दगडाचा काळा व्यवहार कोणाच्याही लक्षात आला नसल्याचा आरोप पत्रकार नमूद आहे

संधी साधू लोकांपासून तसेच ठेकेदारांपासून सावध राहावे अशी अपेक्षा सुशांत मोरे यांनी खासदार छ उदयनराजे भोसले यांच्याकडून व्यक्त केली आहे दानशूर उद्योगपती बाबासाहेब कल्याणी यांनी अवघ्या एक रुपयांमध्ये ही जागा सातारकर जनतेसाठी दिली त्या जागेवर साताऱ्याची भव्य प्रशासकी इमारत उभी राहत आहे ही इमारत उभी राहत असताना भ्रष्टाचाराने बरबटलेले हात या कामाला लागू नये याची काळजी घेणे गरजेचे आहे बाबासाहेब कल्याणी यांनी केलेल्या त्यागाची व दानशूर पणाची जाणीव ठेवून प्रशासनाने कारभार करावा अशी अपेक्षा मोरे यांनी व्यक्त केली आहे

Adv