Friday, July 24, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City आम्हीही साडेतीन महिन्यापूर्वी अशीच मॅच जिंकली”,ठाण्यातील कार्यक्रमात CM शिंदेंची शाब्दिक फटकेबाजी

आम्हीही साडेतीन महिन्यापूर्वी अशीच मॅच जिंकली”,ठाण्यातील कार्यक्रमात CM शिंदेंची शाब्दिक फटकेबाजी

240
Adv

देशभरात सध्या दिवाळीचा माहोल आहे. त्यातच भारताने पाकिस्तान विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये रोमहर्षक विजय मिळवला. म्हणूनच काल देशभर फटाक्यांच्या आतिषबाजीत दिवाळीच्या उत्सवाला सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील कालच्या मॅचमुळे चांगलेच प्रभावित झाल्याचे पाहायला मिळाले. काल टीम इंडियाने एक मॅच जिंकली. तशीच मॅच आपण तीन साडेतीन महिन्यांपूर्वी जिंकलीय अशी दमदार बॅटिंग मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यात केल्याचे दिसून आले.

सध्या दिवाळीला सुरुवात झालेली असल्यामुळे सर्वत्र विविध कार्यक्रमाची रेलचेल पाहायला मिळते. राजकारणी मंडळी देखील सध्या अनेक दिवाळी कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील ठाण्यातील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी त्यांनी ठाणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना जोरदार शाब्दिक फटकेबाजी केली. भारत पाकिस्तान मॅच भारताने जिंकली त्याचा सर्वांना आनंद झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हंटले.

काय म्हणाले शिंदे नेमकं यावेळी
आपण टीव्हीवर पाहिलं कि नाही, हे माहित नाही परंतु मेलबर्नमध्येही बाळासाहेबांची शिवसेना झळकली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. कालची मॅच जिंकली तशीच मॅच आम्ही तीन साडे तीन महिन्यापूर्वी खेळलो आणि जिंकली ती महाराष्ट्राने,देशभराने आणि जगभराने देखील पहिली. लोकांचे मनातले राज्य आणण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे अशी जोरदार बॅटिंग यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

Adv