मुख्यमंत्री शिंदे यांनी केले दिनदर्शिका चे प्रकाशन

938
Adv

सातारा दि.9 : बाळासाहेबांची शिवसेनेचे सातारा शहर प्रमुख व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख निलेश मोरे यांनी छपाई केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकशान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच दरे ता. महाबळेश्वर येथे संपन्न झाले.
दीनदर्शिका प्रकाशन सोहळ्यास बाळासाहेबांची शिवनेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव, ठाणे महानगर पालिकेचे नगरसेवक प्रकाश शिंदे यांच्यासह सातारा शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.

*सातारा शहरासह जिल्ह्यात दिनदर्शिकांचे वाटप करणार*

शिवसेना वैद्यकीय मतदत कक्षाची माहिती देणारी दिनदर्शिका नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली आहे. ही दिनदर्शिका सातारा शहरासह जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याचा मानस असल्याचे बाळासाहेबांची शिवसेनेचे सातारा शहर प्रमुख व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख निलेश मोरे यांनी व्यक्त केला.
या दिनदर्शिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला कशी व कोणत्या प्रकारची वैद्यकीय मदत दिली जाते याची माहिती मिळणार आहे. तसेच अशा प्रकारची मिळविण्यासाठी कोणाकडे संपर्क साधता येईल याचीही माहिती या दिनदर्शिकेच्या माध्यमातून सामान्यापर्यंत पोहचणार आहे. वैद्यकीय मदतीची आवश्यकता असणाऱ्या सर्वसामान्य गरजु लोकांना याचा नक्कीच लाभ होईल असा विश्वासही श्री.मोरे यांनी व्यक्त केला.

Adv