छत्रपती कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी सातारकरांची विक्रमी गर्दी.

205
Adv

सातारा..येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर स्मार्ट एक्स्पो ग्रुप सांगली च्या व्यवस्थापन अन्तर्गत व मा.श्रीमंत छ. उदयन राजे भोसले मित्र समूह , जय सोशल फौंडेशन चे वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती कृषी 2023 या कृषी औद्योगिक व वाहन महोत्सवाचे मध्ये सातारकरांनी शनिवारी प्रचंड गर्दी करत या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .
बेळगाव जिल्ह्यातून आलेला नाईक परिवाराचा दीड टन वजनाचा गजेंद्र रेडा हा यावर्षी या महोत्सवात विशेष आकर्षण ठरत आहे. तसेच स्वयंचलित ड्रोन जो शेतकऱ्यांसाठी बहुविध उपयोगी असा मदतीचा हात देणारा सहकारी म्हणून शेतकरी वर्गाकडून या ड्रोन ला पाहण्यासाठी आजमावण्यासाठी आणि त्याची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी ही गर्दी होत आहे.
या प्रदर्शनात 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता सरगम संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यानंतर या महोत्सवाची रात्री दहा वाजता सांगता होणार आहे.
या कृषी महोत्सव आणि प्रदर्शन चे संयोजक सोमनाथ शेटे यांनी यावर्षी सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनाला विशेष उपस्थिती लावून विक्रमी गर्दी करत हे प्रदर्शन पाहिले आणि डोळ्यात साठवले याबद्दल मनापासून त्यांनी आभार मानले असून दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या या प्रदर्शनामध्ये विविध गृहपयोगी साहित्य ,वाहने तसेच शेतकऱ्यांसाठी शेती विषयक माहिती देणारी प्रदर्शने, अवजारे, उपयोगी साधने यामुळे हे प्रदर्शन दरवर्षी अतिशय उत्साहात भरत असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. खवय्यांसाठीही हे प्रदर्शन एक पर्वणी ठरत असून वाहन विक्री करणाऱ्या विविध कंपन्यांचे स्टॉलही या प्रदर्शनात लक्ष वेधून घेत आहत
चायनीज, कॉन्टिनेन्टल ,पंजाबी ,फास्टफूड स्टॉल ही सध्या या ठिकाणी गर्दी करत आहेत .महिलांसाठी सौंदर्यप्रसाधने, लेडीज वेअर तसेच चप्पल, ब्युटी पार्लर चे साहित्य गळ्यातील ,कानातील आर्टिफिशियल दागिने तसेच आरोग्यदायी मसाज , औषधे घरातील इतर स्वयंपाक घरातील साधना समावेत या प्रदर्शनात यावर्षी सादर झालेले होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम तसेच संमोहन विद्या शिकवणारे डॉ. सुभाष कोष्टी यांचे संमोहनाचे खेळ आणि सोबत शनिवारी रंगलेला सरगम हा सुमधुर संगीताचा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरत आहे.
यावर्षी सादर झालेला डॉग शो ही प्रचंड प्रमाणात सातारकरांना आवडला या प्रदर्शनात डॉग शोमध्ये सहभागी झालेली 28 देशी आणि परदेशी जातीची डॉग पाहण्यासाठी सातारकर यांची मोठी गर्दी होत होती.
संमोहनाचे कार्यक्रमांमध्ये कशा पद्धतीने एखाद्यावर भूल पाडून त्याच्या मनाचा ताबा घेतला जातो याची प्रात्यक्षिक ही सातारकरांना पाहायला मिळाली.
महिलांना आवडणाऱ्या पैठणी साडीची बक्षिसातून मिळालेली भेट ही सातारा जिल्ह्यातील महिलांसाठी एक पर्वणी ठरली. सातारचे सुप्रसिद्ध कंदी पेढे तसेच पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ज्योतिर्लिंग देवस्थानचे कलाकंद ,कुंदा, आणि पेढेही सातारकरांनी विशेष आवडीने घेतले आणि त्याची विक्री होत आहे .वास्तवातील हेडफोन, मोबाईल त्याची कव्हर्स तसेच इतर विविध प्रकारचे साहित्य या ठिकाणी विक्रीस उपलब्ध आहे सेंद्रिय पद्धतीने बनवलेला गुळ विविध प्रकारचे मसाले, मनुके, बेदाणे ,काजू यांचे स्टॉलही गर्दी करत आहेत. बेकरी प्रॉडक्ट्स व त्यातील विविध प्रकार खरेदीसाठी ही सातारकरांची मोठी गर्दी होत आहे.
बालगोपाळांसाठी मनोरंजन नगरी आली आहे या सर्व प्रदर्शनाचा लाभ सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घ्यावा तसेच खास शेतकऱ्यांनी बनवलेली उत्पादने ग्राहकांना थेट योग्य दरात मिळावी यासाठीच ही उपलब्धता या प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती यावेळी सोमनाथ शेटे यांनी दिली. दसरा-दिवाळीची येऊ घातलेली पर्वणी लक्षात घेतात खरेदीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी हे प्रदर्शन खऱ्या अर्थाने एक पर्वणी ठरणार आहे असेही सोमनाथ शेटे यांनी सांगितले.

Adv