Wednesday, April 15, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City ५ फेब्रुवारीपासून श्री.छ. दादामहाराज क्रिकेट स्पर्धा

५ फेब्रुवारीपासून श्री.छ. दादामहाराज क्रिकेट स्पर्धा

622
Adv

गेल्या २ दशकाहून अधिक काळ संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय असणाऱ्या श्री.छ.प्रतापसिंहराजे भोसले उर्फ दादामहाराज दिवस-रात्र टेनिस चेंडु चषक क्रिकेट स्पर्धा यावर्षी दि.५ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी अखेर छ.शाहु स्टेडीअमयेथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समुह सातारा यांच्या वतीने संयोजक श्री.अमोल पाटुकले यांनी दिली.

याबाबत अधिक माहीती देताना प्रसिध्दीपत्रकात नमुद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रात दिवस-रात्र टेनिसचेंडू क्रीकेट स्पर्धा क्वचित आयोजित होत असतात. त्यातही श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे उर्फ दादामहाराज डे-नाईटक्रीकेट स्पर्धा ख्यातकिर्त झाली आहे.श्री छ उदयनराजे भोसले यांच्या प्रेरणेने होणाऱ्या या स्पर्धेसाठी क्रीकेट संघांचा प्रवेश मर्यादित असणार आहे. सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे या स्पर्धेला तांत्रिक
सहकार्य लाभलेले आहे.सर्वोतकृष्ठ नियोजन तसेच आंतरराष्ट्री क्रिकेट नियमवालिनुसार संयोजन,आर्कषक प्रकाशयोजना इत्यादी वैशिष्टयामुळे या स्पर्धेचा लौकिक देशभर झाला आहे. या स्पर्धेला स्वतः खासदार श्रीमंत छत्रपतीउदयनराजे भोसले यांचे मार्गदर्शन लाभत असते. त्यांच्या माध्यमातुन क्रिकेट खेळाडूना मोठे प्रोत्साहन मिळत आहे.या वर्षी, स्पर्धा विजेत्या संघाला रुपये १,११,१११ व उपविजेता संघाला ६६,६६६ रोख पारितोषीक व चषकप्रदान करण्यात येणार आहेत तर उपांत्य फेरीपर्यंत धडक मारणा-या दोन संघाना प्रोत्साहनात्मक प्रत्येकी रोख रुपये२२,२२२ चे पारितोषीक प्रदान करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत क्रीकेट संघाला प्राधान्य तत्वानुसार मर्यादित प्रवेश देण्यात येणार असुन संयोजन व्यवस्थित व्हावेयासाठी इच्छुक संघांना आपला प्रवेश ४ फेब्रुवारी अखेर निश्चित करावा लागेल. प्रवेश निश्चितीसाठी संघानी विहितनमुन्यात अर्ज भरुन प्रवेश फी भरल्यावरच संघाची नोंदणी करण्यात येणार आहे. ४ फेब्रुवारी 24 नंतर किंवाआयत्यावेळी कोणत्याही संघाला प्रवेश देण्यात येणार नाही याची सर्व इच्छुक संघानी नोंद घ्यावी.इच्छुक संघानी मार्शल स्पोर्टस्, नगरपरिषद शॉपिंग सेंटर, सातारा (मो. ९७६५७०००४९) अथवा विघ्नहर्ता स्पोटस्पंताचा गोट, खंडोबा मंदिर समोर सातारा (मो.९८८१५७५३८४) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन श्री छ उदयनराजे भोसले मित्र समुहाच्या वतीने संयोजकांतर्फे अमोल पाटुकले यांनी कळविले आहे.

Adv