तुतारी चिन्हाचं अनावरण होत असतानाच भाजप नेत्याची जहरी टीका

112
Adv

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर  शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाला 3 चिन्हांचे पर्याय दिले होते. त्यात कपबशी, वटवृक्ष आणि तुतारीचा समावेश होता. निवडणूक आयोगाने त्यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले.
शरद पवार याच चिन्हाचे अनावरण शनिवारी किल्ले रायगडवरुन करण्यात आलं. यादम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही टीका केली आहे. तुम्ही तुताऱ्या वाजवा… नाहीतर मशाली पेटवा. पण आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही 45 पेक्षा जास्त जागा आम्ही निवडणूक आणू, असं म्हणत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार गट आणि ठाकरे गटावर टीका केली आहे.

Adv