Friday, September 25, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City महानायकाच्या स्मारकाला मोकळा श्वास कधी मिळणार?

महानायकाच्या स्मारकाला मोकळा श्वास कधी मिळणार?

49
Adv

क्रांती दिनानिमित्त सातारा नगरपालिकेच्या वतीने हुतात्मा स्मारक तसेच शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले. प्रारंभी कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकास अभिवादन केल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्यसैनिकही उपस्थित होते.

पुष्पहार अर्पण करताना अतिक्रमणाकडे नजर गेली का?
मात्र, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी पालिकेचे पदाधिकारी पोहोचले असताना पुतळ्यासमोरील परिसरातील हातगाड्या, दुकाने व इतर अडथळ्यांमुळे निर्माण झालेल्या अतिक्रमणाच्या प्रश्नाकडे पालिका प्रशासनाचे लक्ष गेले का?, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नेताजींसारख्या महान स्वातंत्र्यवीराच्या स्मारकासमोरच परिसर व्यापलेला दिसत असेल, तर स्मारकाच्या सन्मानाबरोबर त्याच्या परिसराची स्वच्छता, सुशोभीकरण आणि मोकळीक राखण्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
कार्यक्रमापुरते अभिवादन की प्रत्यक्ष कृती?
क्रांती दिनानिमित्त महापुरुषांना अभिवादन करणे ही गौरवाची बाब आहे. मात्र, अभिवादन केल्यानंतर त्याच महापुरुषांच्या स्मारकाभोवती असलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले, तर हा केवळ औपचारिक कार्यक्रम ठरणार नाही का, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः हा परिसर पाहिला असेल, तर आता कारवाई कधी?
नेताजींच्या पुतळ्यासमोरील अतिक्रमणाचा विळखा कधी सुटणार?
महानायकाच्या स्मारकाला मोकळा श्वास कधी मिळणार?

Adv