सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची बिनविरोध निवडीकडे वाटचाल होत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. छ उदयनराजे भोसले यांचा एकमेव अर्ज कायम असून, त्यांच्या समर्थकाचा अर्जही अद्याप मैदानात आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणाचा निर्णय होईपर्यंत समर्थकाचा अर्ज कायम ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेतील दहा विद्यमान संचालकांच्या दहा वर्षांच्या पात्रतेशी संबंधित निर्णयाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणाचा निकाल २० ऑक्टोबर रोजी अपेक्षित असल्याने त्याकडे संपूर्ण जिल्हा बँक निवडणुकीचे लक्ष लागले आहे. काही समर्थकांचे अर्ज खबरदारी म्हणून कायम ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे.
मात्र, सध्याच्या प्राथमिक स्थितीत छत्रपती उदयनराजे भोसले यांची बिनविरोध निवडीकडे वाटचाल होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. या भेटीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना आणखी रंग चढला आहे.
एकीकडे न्यायालयीन निकालाची प्रतीक्षा तर दुसरीकडे उदयनराजेंच्या बिनविरोधी वाटचालीचे संकेत त्यामुळे २० ऑक्टोबरच्या निकालाकडे आता जिल्हा बँकेच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Home Latest News Politics|Satara District मैत्रीचा हात, राजकारणाची साथ छ उदयनराजे भेटीने जिल्हा बँकेत चर्चेला उधाण






