Sunday, October 11, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District खणआळीतील मोजमाप पालिकेच्या विभागालाच माहीत नाही?

खणआळीतील मोजमाप पालिकेच्या विभागालाच माहीत नाही?

171
Adv

समर्थ मंदिर परिसरातील बोगद्याजवळील अतिक्रमणधारकांवर जो नियम लावला, तोच नियम खणआळीतील नागरिकांनाही लावा. नियोजन सभापती अशोक शेडगे साहेब, न्याय करताना दुजाभाव दिसता कामा नये, अशी स्पष्ट भूमिका सातारकर नागरिक व्यक्त करत आहेत.

खणआळीतील मोजमाप प्रकरणाबाबत पालिकेच्या बांधकाम व अतिक्रमण विभागालाच माहिती नसल्याचे समोर येत असेल, तर या कारवाईच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. गरिबांसाठी एक नियम आणि खणआळीतील नागरिकांसाठी दुसरा नियम, अशी भूमिका नियोजन सभापती अशोक शेडगे यांनी घेऊ नये, अशी नागरिकांची मागणी आहे.
मोजमापाबाबत शंका असतील तर तज्ज्ञ अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पुन्हा मोजमाप करा

मात्र सर्वांना समान न्याय द्या! पालिकेची कारवाई पारदर्शक असावी आणि नियमांची अंमलबजावणी करताना कोणताही भेदभाव होऊ नये, हीच सातारकरांची अपेक्षा आहे.

Adv