Monday, September 21, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तळ्यावर २० रुपयांची मागणी?

गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तळ्यावर २० रुपयांची मागणी?

125
Adv

गणेश विसर्जनासाठी पालिकेने उभारलेल्या कृत्रिम तळ्यावर २० रुपये मागितल्याचा आरोप समोर आल्याने भाजपच्या सत्तेतील सातारा पालिकेच्या कारभारावर संतप्त सवाल उपस्थित होत आहेत. गणरायाच्या विसर्जनासाठी नागरिकांनी पालिकेच्या व्यवस्थेचा वापर करायचा आणि त्यासाठीच पैसे मागितले जाणार असतील, तर ‘जनतेची सेवा’ म्हणवणाऱ्या भाजपच्या सत्तेचा हा कोणता कारभार? असा सवाल सातारकर करत आहेत.

पैशांची मागणी झाल्याने दोन नागरिकांनी कृत्रिम तळ्यात विसर्जन न करता दुसरीकडे गणेशमूर्ती विसर्जित केल्याची माहिती आहे. ठेकेदाराला दिलेल्या तळ्यावर नेमक्या कोणाच्या आदेशाने पैसे मागितले गेले, याचे उत्तर पालिका प्रशासन आणि सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी जनतेला द्यावे. पालिकेच्या तिजोरीतून व्यवस्था उभी करायची, ठेका द्यायचा आणि पुन्हा विसर्जनासाठी नागरिकांच्या खिशाकडे हात करायचा—हा भाजपच्या सत्तेतील ‘अच्छे दिन’चा नमुना आहे का? असा बोचरा सवाल आता उपस्थित होत आहे.

पालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी केवळ पाहत बसण्याऐवजी या आरोपाची तातडीने चौकशी करून दोषी कोण हे स्पष्ट करावे, अन्यथा गणेशोत्सवाच्या नावाखाली नागरिकांकडून वसुलीला मोकळे रान कोणी दिले? याचा जाब सातारकरांकडून विचारला जाण्याची शक्यता आहे.

Adv