सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अमृत महोत्सवाचा समारोप कार्यक्रम दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सैनिक स्कूल मैदान येथे होणार असून बँकेच्या इतिहासात शरद पवार यांना डावलून हा कार्यक्रम होत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत पवार साहेब यांना डावलून होणाऱ्या कार्यक्रमावर जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन अनिल देसाई व आमदार बाळासाहेब पाटील यांची भूमिका काय याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे
केंद्रीय कृषिमंत्री यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी बाबासाहेब कल्याणी यांच्याकडून जागा मिळवून दिली तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला नाबार्डसह,शासनाच्या माध्यमातून मदतही केली त्याच शरद पवार यांना डावलुन जिल्हा बँकेचे संचालक मंडळ व अधिकारी बँकेचा अमृत महोत्सवाचा समारोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्याचा घाट घातला असून येत्या दोन तारखेला मोठ्या दिमाखात हा कार्यक्रम पार पडणार असल्याचे समजते
येणाऱ्या मान्यवरांचे बँकेसाठी योगदान काय
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी बँकेला मदत केली मात्र इतर प्रमुख मान्यवरांचे बँकेसाठी योगदान काय असा प्रश्न उपस्थित होत आहे
चेअरमन व co यांची दिल्लीवारी ठरली निष्पळ
जिल्हा बँकेच्या समारोपाला केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी यावे अशी गळ दिल्ली येथे जाऊन बँकेचे चेअरमन नितीन पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी घातली होती त्यात यश न आल्याने ही दिल्ली वारी निष्फळ ठरली अशी चर्चा ही बँकेत ऐकायला मिळते