Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Satara District Panchgani पाचगणी पालिकेचा माझी वसुंधरा अभियानात राज्यात डंका

पाचगणी पालिकेचा माझी वसुंधरा अभियानात राज्यात डंका

331
Adv

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने आयोजीत केलेल्या माझी वंसुधरा अभियानात पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद पाचगणीचा राज्यत प्रथम क्रमांक तर भूमी थीमॅटीक मधील उच्चत्तम कामगिरीमध्ये ही प्रथम क्रमांक पटकवला आहे

पाचगणी पालिकेचा प्रथम क्रमांक मिळाल्याची बातमी पाचगणी मध्ये धडकताच नागरिकांनी मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

पृथ्वी, वायू, जल,अग्नि आणि आकाश या निसर्गाशी संबधित पंचतत्वावर आधारित माझी वंसुधरा अभियान हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये दिनांक १ एप्रिल २०२३ ते दिनांक ३१ मे २०२४ या कालावधीमध्ये राबविण्यात आले. माझी वंसुधरा अभियान ४० याचे मुल्याकन झाले यामध्ये १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गटात पांचगणी गिरिस्थान नगरपरिषद अव्वल ठरली असून नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकवला आहे.त्याच बरोबर भूमी थीमॅटकी मधील उच्चत्तम कामगिरिबदल पांचगणी गिरिस्थान नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकवला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे सहा सचिव श्री.सु.के.निकम यांनी शासन आदेशाव्दारे आज दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी आदेश पारित केला.
हे दोन पुरस्कार प्राप्त झालेबदल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक मा.निखील जाधव या पुरस्कारासाठी सर्व पांचगणी नागरिक तसेच कर्मचारी यांनी परिश्रम घेतले यामुळे
पाचगणी शहराच्या नावलौकीकात भर पडली असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले व मुख्याधिकारी यांनी पांचगणी शहरातील सर्व आजी माझी पदाधिकारी, नागरिक, तसेच शहरातील सर्व पत्रकारांचे आभार मानले.

Adv