आ विनायक मेटे यांनी घेतली मराठा आरक्षण प्रश्नी खा श्री छ उदयनराजे भोसले यांची भेट

114
Adv

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आ.श्री विनायक मेटे यांनी आज जलमंदिर पॅलेस येथे मराठा आरक्षण तसेच इतर प्रश्नांवर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली यावेळी माजी शिक्षण सभापती सुनील काटकर पुढारीचे जिल्हा आवृत्ती प्रमुख हरिष पाटणे, दैनिक महासत्ता चे शरद काटकर काका धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते

मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेण्यासाठी पुण्यात ३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विचारमंथन बैठकीला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे
भोसले यांनी उपस्थित राहावे या साठी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सातायात येऊन दोन्ही राजांना निमंत्रण दिले. दोघांनीही मेटे यांचे निमंत्रण स्विकारले आहे

सध्या राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत, आपोपल्या पद्धतीने, माहितीनुसार, ज्ञानानुसार बोलत राहतात, मागण्यांमध्ये एकवाक्यता नाही, सर्वत्र समन्वयाअभावी वैचारिक सैरभैर वक्तव्य सुरु आहेत. सर्वांना एकत्र आणावे, दिशा द्यावी हि विनंति करण्याकरिता आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. असल्याचे आमदार विनायक मेटे यांनी यावेळी सांगितले

Adv